नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) कॉग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी का (Charanjit Singh Channi) नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार राहतील, याबाबतची जबाबदारी आता कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितलं. (Congress CM Face in Punjab)
चरणजीत सिंह चन्नी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. तेव्हा कॉग्रेसने सिद्धू यांचे पक्षातील कट्टर विरोधक अमरिंदर सिंह यांची पदावरुन हकालपट्टी केली होती. पण नवे मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबतही सिद्धू यांचे मतभेद होत आहेत.
विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार यावरुन सध्या खलबत सुरु आहेत. यासाठी कॉग्रेसने आपल्या इन-हाऊस 'शक्ती' अॅपच्या माध्यमातून पक्ष सदस्यांचे मते जाणून घेतली आहेत. याबाबतचा निर्णय आता शेवटच्या टप्यात असून सोनिया गांधी लवकरच याबाबतची घोषणा करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी चन्नी यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे सिद्धू यांचे मन वळविण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरु आहे. या मुद्यावर सोनिया गांधी तोडगा काढणार आहेत. सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाढत असलेला संघर्ष लक्षात घेता याचा फटका कॉग्रेसला बसू शकतो. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाचा एकच उमेदवार असल्याची घोषणी नुकतीच केली आहे. ''दोन जण नेतृत्व करु शकत नाही. एकच जण नेतृत्व करेल,'' असे राहुल यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसने रविवारी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) आपली तिसरी यादी जाहीर केली. यात एकूण ८ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (charanjit singh channi) यांच्यासाठीही भदौर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना जाहीर करण्यात आलेली ही दुसरी उमेदवारी आहे. यापूर्वी त्यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे चरणजीतसिंह चन्नी आता दोन मतदारसंघातून लढणार आहेत. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून १० मार्च रोजी निकाल लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.