UP Assembly Election 2022 Live Updates |UP Election Results 2022 Live Updates sarkarnama
देश

UP Election 2027: युपीत नवं सत्तासमीकरण! चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; भाजप, सपामध्ये खळबळ

UP Election 2027: देशातल्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. पण त्याच्या सहा महिने आधीच नवी राजकीय समीकरण इथं पाहायला मिळत आहेत.

Amit Ujagare

उत्तर प्रदेश निवडणूक 2027 :

यूपी विधानसभा निवडणूक, चंद्रशेखर आझाद, असदुद्दीन ओवैसी, ओवैसी बातम्या, चंद्रशेखर आझाद बातम्या, यूपी राजकारण, उत्तर प्रदेश राजकारण, भाजप, समाजवादी पक्ष, अखिलेश यादव, योगी आदित्यनाथ, एआयएमआयएम, आझाद समाज पक्ष, सामाजिक परिवर्तन मोर्चा, ओवैसी आझाद युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्री, यूपी मुख्यमंत्रीपद, यूपी निवडणूक बातम्या, उत्तर प्रदेश विधानसभा, भाजपची रणनीती, समाजवादी पक्षाची रणनीती, दलित राजकारण, मुस्लिम राजकारण, दलित मुस्लिम समीकरण, यूपीमध्ये तिसरी आघाडी, नवीन राजकीय आघाडी, उत्तर प्रदेश सत्तासमीकरण, 403 विधानसभा जागा, लखनऊ राजकारण, विरोधी पक्षांची आघाडी, भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष, ओवैसींची राजकीय खेळी, आझाद समाज पक्ष बातम्या, एआयएमआयएम आघाडी, यूपी मतदार, यूपी निवडणूक अपडेट, भारतीय राजकारण, निवडणूक बातम्या, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री, यूपी राजकीय समीकरण, ओवैसी पत्रकार परिषद, चंद्रशेखर आझाद यांचे विधान, यूपी युवक राजकारण, यूपी शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय, बहुजन राजकारण, यूपी निवडणूक प्रचार, 2027 विधानसभा निवडणूक

देशातल्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. पण त्याच्या सहा महिने आधीच नवी राजकीय समीकरण इथं पाहायला मिळत आहेत. त्यानुसार, राज्यात एक नवी राजकीय समीकरण जुळून आलं असून यामध्ये आझाद समाज पार्टीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. यामुळं समाजवादी पार्टी आणि भाजपचं चांगलंच धाबं दणाणलं आहे.

काय आहे समीकरण?

युपीच्या आगामी निवडणुकीसाठी असदुद्दीनं ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांची युती झाली असून त्यांनी 'सामाजिक परिवर्तन मोर्चा'ची घोषणा केली आहे. या नव्यी आघाडीकडून चंद्रशेखर आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या नव्या दलित-मुस्लीम समीकरणामुळं समाजवादी पार्टीच्या पीडीए वोटबँक, बसपाचा बहुजन आधार आणि भाजप-काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर खोलवर परिणाम होणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत सध्या चर्चेमधून आघाडीवर असलेल्या अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांची मात्र झोप उडाली आहे.

युपीच्या निवडणुकीत या नव्या सत्तासमीकरणामुळं निवडणुकीपूर्वीच राजकारणात खळबळ माजली आहे. या नव्या आघाडीच्या घोषणेनंतर राजधानी लखनऊमधील रमाबाई आंबेडकर मैदानात २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एमआयएम आणि आझाद जनता पार्टी या दोन्ही पक्षांकडून सुरुवातीलाच शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. याचा सर्वात महत्वाचा पैलू सामाजिक समीकरण आहे. यामध्ये औवेसी यांच्या राजकारणाचा प्रमुख आधार हा मुस्लीम मतं हा आहे, तर चंद्रशेखर आझाद यांचं राजकारण दलित, वंचित आणि तरुण वर्गात त्यांची असलेली क्रेझ यामध्ये आहे. त्यामुळं या दोघांनी एकत्र येण्यामुळं युपीच्या राजकारणातील गणिती रणनिती बिघडणार आहे. इथल्या राजकारणात कायमच दलित आणि मुस्लिम मतदारांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

सपाच्या पीडीएसमोर मोठं आव्हान

समाजवादी पार्टीनं पिछडा, दलित आणि अल्पसंख्यांक याचं संक्षिप्त रुपमध्ये पीडीए या आधारावर आपलं राजकीय बस्तान बसवलं आहे. याच समीकरणाचा लाभ २०२४ च्या निवडणुकीत सपाला मिळाला होता. त्यामुळं ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी एकत्र येणं सपाच्या या राजकारणाला धक्का देणारं आहे.

भाजपसाठी दिलासा की नवं आव्हान?

भाजपची गोष्ट करायची झाल्यास सामाजिक परिवर्तन मोर्चाचा परिणाम भाजपवर दोन्ही बाजुनं पडू शकतो. पहिल्या स्थितीत जर सामाजिक परिवर्तन मोर्चा मुस्लिम आणि दलित मतदारांना एक भाग सपापासून वेगळा करण्यात यशस्वी झाला, तर विरोधकांच्या मतांचं विभाजन भाजपसाठी काही जागांवर फायदेशीर ठरु शकतं. उत्तर प्रदेशात विजय-पराजयाचं अंतर हे खूपच कमी असतं. त्यामुळं एका तिसऱ्या पक्षाला किंवा आघाडीला किती मतं पडतात यावरही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. जर चंद्रेशखर आझाद आणि ओवैसी यांनी पश्चिम उत्तर प्रदेश, रुहेलखंड, तराई आणि काही मध्ये उत्तर प्रदेशातील या जागांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकू शकतात. कारण या भागात दलित आणि मुस्लिमांची मतं निवडणुकीची गणितं बघडवू शकतात.

बसपासाठी सत्तेचा रस्ता बिकट

बसपाचं राजकारण हे बऱ्याच काळापासून दलित राजकारणाचं प्रमुख चेहरा होतं. त्यामुळं जर चंद्रशेखर आझाद यांचा मतदार हा बसपाला कंटाळलेला मतदार आहे. त्यामुळं तो आझाद यांच्याकडं वळून बसपला मोठा झटका बसू शकतो. त्यामुळं इथं बसपाचं गणित बिघडू शकतं.

तसंच काँग्रेससाठी देखील राजकीय पट बदलू शखतो

या युतीचा फटका काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवरही पडू शकतो. जर येत्या काही काळात सामाजिक परिवर्तन मोर्चाची नंतर अनेक छोट्या मोठ्या घडामोडी घडू शकतात, त्यामुळं काँग्रेसलाही या बारीक गोष्टींचा मोठा फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT