Nitin Gadkari: "आम्हा सगळ्यांच्या मनात एक खंत आहे", कोल्हापूरच्या दूध उत्पादनावर नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? डेअरीच्या विकासावरही केलं भाष्य

Nitin Gadkari: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात गोकूळची निवडणूक यंदा राज्यभर विशेष गाजली. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या मध्यस्थीनं इथला अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला, त्यावर गोकूळ अद्यापही चर्चेत आहे.
Nitin Gadkari on Gokul
Nitin Gadkari on GokulNitin Gadkari on Gokul
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात गोकूळची निवडणूक यंदा राज्यभर विशेष गाजली. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या मध्यस्थीनं इथला अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला, त्यावर गोकूळ अद्यापही चर्चेत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोकुळबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात बोलताना आम्हाला सर्वांना एका गोष्टीची खंत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण नेमकी त्यांनी काय भूमिका मांडली, जाणून घेऊयात.

नागपूरमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "नागपूरमधून दहा लाख लिटर दूध सध्या मदर डेअरी गोळा करते. मदर डेअरी आल्यामुळं इतर खासगी दूध संघांनाही आपला भाव वाढवावा लागला. पण आमच्या सर्वांच्या मनात एक खंत आहे की, एकट्या कोल्हापुर जिल्ह्यात जेवढं दूध संकलन होतं तेवढं संपूर्ण विदर्भातही होत नाही. दीड कोटी दुधाचं संकलन फक्त कोल्हापूर जिल्ह्यात होतं तर विदर्भात केवळ १ कोटी रुपये लिटर दुध संकलन होतं"

Nitin Gadkari on Gokul
Vasai Knife Attack : वसईत दिवसा ढवळ्या चाकूने हल्ला, आनंद पाटील जखमी; आरोपी फरार !

त्यामुळं इथं दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी मदर डेअरीबरोबरच व्हेटर्नरी कॉलेजनंही पुढाकार घेऊन आपण एम्ब्रियो ट्रान्सफर सारखा यशस्वी प्रयोग केला. १९५२ साली आपल्या देशातील गीर जातीची गाय ही ब्राझिलला गेली त्यानंतर तिथल्या लोकांनी ही गाय विकसित केल्यानंतर तिनं ६० लिटर दूध दिलं. तिचा जो सांड तयार झाला त्याचं वीर्य काढून ते आपल्या गाईंना दिल्यानंतर असं लक्षात आलं की, ते दिल्यामुळं दोन लिटरच्या गाईला १२ ते १५ लिटरची गोऱ्ही झाली. आता तर तंत्रज्ञान इतकं बदललं आहे की, जसं टेस्टट्युब बेबी आहे तसं टेस्टट्युब गोऱ्हीची सुरुवात झाली.

विदर्भात डेअरीचं आर्थिक गणित बसत नाही - गडकरी

आपल्या विदर्भात मदर डेअरी आली पण आपली देशी गाय ही दोन ते तीन लिटरच्यावर दूध देत नसल्यानं त्याला आर्थिक गणित बसत नाही. त्यामुळं त्या गाईला आपण जर निश्चितपणे एम्ब्रियो ट्रान्सफर करुन विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नवीन गोऱ्ही तयार झाल्या तर विदर्भातही देशी गाय १५-२० लिटर दूध देऊ शकतील. आपल्याकडं एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी जी प्रयोगशाळा लागते त्याला दीड ते दोन कोटी रुपये खर्च येतो. आपल्या राज्यात अशा तीनच प्रयोगशाळा आहेत. यामध्ये सांगलीत चितळेंची आहे, बारामतीत शरद पवारांनी निर्माण केलेली आहे आणि आपण व्हेटर्नरी कॉलेजमध्ये सुरु केलेली तिसरी आहे. याच्यामदतीनं जोपर्यंत विदर्भात आपण १२ ते १५ लिटर दूध देणाऱ्या देशी गायी विकसित करणार नाही तोपर्यंत आपल्या दुधाचं उत्पादन वाढू शकणार नाही.

Nitin Gadkari on Gokul
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार फुटणार? सुनील तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, 'आमचा पक्ष …'

प्रत्येक जिल्ह्यात एकतरी एम्ब्रियो लॅब आवश्यक

त्यामुळं एम्ब्रियो ट्रान्सफर करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या आपल्याकडं प्रत्येक जिल्ह्यात किमान एकतरी असायला हवी. त्यामुळं आपल्या देशी गायींचं उत्पादन वाढणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नेपिअर ग्रास लावण्याचा देखील प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. त्यामुळं विदर्भात दुग्ध उत्पादनाचं जे स्वप्न आहे ते मदर डेअरीच्या रुपानं नक्कीच पूर्ण होणार आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.