Akhilesh Yadav sarkarnama
देश

ठाकरेंच्या शिवभोजन थाळीनंतर आता अखिलेश यादवांची समाजवादी थाळी

सरकारनामा ब्युरो

गाझियाबाद : उत्तरप्रदेश निवडणुकीत (UP Assembly elections 2022) प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. समाजवादी पक्षही (sp) पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सत्तेच्या या संघर्षात शिवसेनेची योजना समाजवादी पक्षाकडून काही प्रमाणात पाळली जात आहे.

''समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यास दहा रुपयांत समाजवादी थाळी देऊ,'' अशी घोषणा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ३०० युनिट मोफत वीज, समाजवादी पेन्शन योजना देखील राज्यात लागू केली जाईल, असे सांगितले. या घोषणेचा थेट संबंध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवभोजन योजनेशी असल्याची चर्चा आहे.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात सपाचे सरकार आल्यास गरीबांना 10 रुपयांत समाजवादी थाळी दिली जाईल, अशी मोठी घोषणा केली. ताटात पौष्टिक आहार दिला जाईल.

याशिवाय 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. यासोबतच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजवादी पेन्शन योजनाही जाहीर केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्याची घोषणाही केली होती. योगी आदित्यनाथ हे भाजपचे सदस्य नसल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. अखिलेश यादव यांनी यावेळी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला

अखिलेश यादव म्हणाले, ''योगी आदित्यनाथ यांना पक्षाकडून तिकीट मागावे लागले आणि मी इथून निवडणूक लढवेन, तिथून निवडणूक लढवेन, असे सांगावे लागले. परंतु भाजपने योगी यांना त्यांच्या घरी गोरखपूरला पाठवले, जेणेकरून ते परत लखनौला येऊ शकणार नाही,''

''भाजपने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या (Farmers) आंदोलनामुळे वाकावे लागले आणि कृषी कायदे परत घ्यावे लागले. शेतकऱ्यांचा भावना भाजपला समजत नसल्याची टीका त्यांनी केली. देशातील ८० कोटी लोकांना अन्नधान्य देत असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे, परंतु ८० कोटी लोकांना बेरोजगार केले, हे ते का सांगत नाहीत,''असा सवाल अखिलेश यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येताच शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गरीब आणि गरजूंना स्वस्त धान्य मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये, जिल्हा रुग्णालये, बसस्थानक, रेल्वे परिसरात शिवभोजन थाळी दिली जाते. याच धर्तीवर समाजवादी थाळीची घोषणा अखिलेश यादव यांनी केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT