Anurag Thakur
Anurag Thakur  
देश

UP Election समाजवादी पक्षाचा दहशतवादाशी संबंध; केंद्रीय मंत्र्याचा धक्कादायक आरोप

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणूकांची (Uttar Pradesh Election) रणधुमाळी सुरु आहे. अस असतानाच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी युपीच्या समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) धक्कादायक आरोप केल्याती माहिती समोर आली आहे. युपीत आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच अनुराग ठकूर यांनी समाजवादी पक्षावर दहशतवादाशी (Terrorism) संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावरून मंत्री अनुराग ठाकूर यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला आहे.'2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांचा थेट संबंध उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही समाजवादी पक्षाचे नेते गप्प आहेत. हे मौन पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या संरक्षणाकडे बोट दाखवते. 2012 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी, मुस्लिम तरुणांवरील दहशतवादाचे आरोप, गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांच्यावर आरोप लावणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे थेट सपाच्या जाहीरनाम्यात लिहिले होते, असे घणाघाती आरोप अनुराग ठाकूर यांनी केले आहेत.

अखिलेश यादव यांची विचारसरणी 'मुह में राम, बगले आतंकवादी' अशी आहे. भारतातील हा पहिला पक्ष आहे ज्याने २०१२ मध्ये आपल्या जाहीरनाम्यात, आपले सरकार आल्यास ते मुस्लिम तरुणांवरील दहशतवादाचे आरोप मागे घेतले जातील आणि त्यांची सुटका केली जाईल. सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अयोध्या, काशी येथे दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवरील सर्व खटले मागे घेतले.

समाजवादी पक्षाने लखनौ, रामपूर आणि इतर जिल्ह्यांतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींनाही वाचवले. ते समाजवादी नसून समाजद्रोही आहेत. समाजवादी पक्ष दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे काम करते. सपाने आझमगडमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिले. समाजवादी पक्षाला आझमगडला दहशतवाद्यांचा गड बनवण्याचा हेतू आहे. त्यांचा एसटीएफ आणि पोलिसांवर विश्वास नाही. सपा सरकारमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे दहशतवाद्यांना संरक्षण मिळते, असा घणाघाती आरोपही यावेळी केला.

तर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनीही समाजवादी पक्षावर निशाणा साधला. ''पूर्वीच्या सरकारांमध्ये शेतकरी आत्महत्या करायचे, गरीब उपाशी मरायचे, युपीत जंगलराज सुरु होते. गुन्हेगारांचे वर्चस्व होते. 2017 पूर्वी सगळीकडे अराजकतेचे वातावरण होते. अहमदाबाद बॉम्बस्फोटात न्यायालयाने ३८ आरोपींना दोषी ठरवले आणि काहींना फाशीची शिक्षा सुनावली. यामध्ये एका दहशतवाद्याचे कुटुंब सपाच्या राष्ट्रीय अध्यक्षासोबत मत मागताना दिसत आहे. आताही तेच सुरु आहे, सपाचा हात दहशतवाद्यांसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT