Ramjilal Suman controversy Sarkarnama
देश

UP Rana Sanga Controversy : 'गद्दार' शब्दावरून यूपीत भडका! 'या' खासदाराच्या घरावर थेट बुलडोझर घेऊन गेला जमाव, पोलिसांवर दगडफेक

Rana Sanga traitor remark : राणा संगा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार रामजीलाल सुमन यांच्याविरोधात करणी सेना आक्रमक झाली आहे. अशातच संतापलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामजीलाल यांच्या आग्रा येथील घरावर हल्ला केला आहे.

Jagdish Patil

Ramjilal Suman controversy : कॉमेडियन कुणाल कामराच्या (Kunal Kamra) विडंबन गीतातील 'गद्दार' या शब्दामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलाचं तापलं आहे. अशातच आता याच 'गद्दार' शब्दावरून उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांच्या घरावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भयंकर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

राणा संगा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार रामजीलाल सुमन (MP Ramjilal Suman) यांच्याविरोधात करणी सेना आक्रमक झाली आहे. अशातच संतापलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामजीलाल यांच्या यूपीतील (Uttar Pradesh) आग्रा येथील घरावर हल्ला केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये एका इन्स्पेक्टर जखमी झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सपाचे खासदार रामजीलाल सुमन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते राणा संगा यांना 'गद्दार' असं म्हणत आहेत. तसंच इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी बाबरला भारतात आणणारा राणा संगा होते, असंही ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे करणी सेना आक्रमक झाली आहे.

अशातच बुधवारी रामजीलाल यांच्या घरावर करणी सेनेच्या (Karni Sena) हजारो कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याआधी खबरदारी म्हणून पोलिसांनी घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. तरीही जमावाने खासदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचा पोलिसांशी (Police) वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

शिवाय करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या घराबाहेरील गेट तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. यावेळी पोलिस आणि जमावामध्ये झालेल्या गोंधळात इन्स्पेक्टर हरीश पर्वत यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, करणी सेनेचे अनेक कार्यकर्ते बुलडोझर घेऊन रामजीलाल यांच्या निवासस्थाबाहेर पोहोचले होते.

मात्र, पोलिसांनी बुलडोझर बाहेर थांबवल्यामुळे जमावाने मागच्या गेटमधून आत घुसून तोडफोड करायला सुरूवात केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गद्दार शब्दावरून वाद सुरू असतानाच उत्तर प्रदेशातही याच शब्दामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT