Dhairyasheel Mane : 'कुणाल कामरा जोकर कॉमेडियन, गांजा भूत जे देतो ते...', शिंदेंच्या खासदारानं संसद दणाणून सोडली

Dhairyasheel Mane On Kunal Kamra : स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त केल्यानं वाद वाढला आहे. यावरून आता राज्यासह देशात संताप व्यक्त केला जातोय.
Kunal Kamra| Eknath shinde
Kunal Kamra |Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News : स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं म्हटल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. या गाण्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकानी जेथे हा शो झाला त्याची तोडफोड केली. तसेच कुणाल कामरानं माफी मागावी अन्यथा राज्यात त्याचा शो होवू देणार नाही, अशी भूमीका घेतली आहे.

याच प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर आता याच मुद्द्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारानं संसद दणाणून सोडली. खासदार धैर्यशील माने यांनी यावरून घणाघाती टीका केली असून कुणाल कामरानचा डोक्याचा एक भाग मोकळा असल्याची टीका केली आहे.

स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका पाठोपाठ वादग्रस्त गाणी म्हटल्याने वाद चिघळला आहे. पहिल्या व्यंगात्मक गाण्यानंतर तोडफोड झाली. यानंतर त्याने आपण अशा झूंडशाहीली घाबरणारे नसून लढणारे आहोत, असे म्हणत दुसरे गाणं सोशल मीडियात पोस्ट केलं आहे.

यामुळे पुन्हा एकदा हा वाद चिघळला आहे. यावरून शिंदे शिवसेनेचे नेते तथा कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत विरोधकांसह कुणाल कामराला घेरलं आहे. विरोधकांसह त्यांनी कामरावर निशाना साधला आहे.

धैर्यशील माने यांनी बजेट 2025 वर चर्चेत भाग घेताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत प्रगतीच्या नवीन उंचीवर जात आहे. पण विरोधक त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. काँग्रेसच्या काळात मुघलांप्रमाणे कर लादण्यात आला. 60 हजार कमाई करणाऱ्या माणसाला देखील यांनी करातून मुक्ती दिली नाही.

उलट जीएसटी आल्यावर गब्बर टॅक्स म्हणून टीका केली. पण आज याच टॅक्स देणाऱ्या लोकांमुळे देश प्रगतीपथावर निघाला आहे. यामुळेच 12 लाख रूपये उत्पन्न असणाऱ्यांची करातून मुक्तताता मोंदींनी केली आहे. त्यांचा हा ऐतिहासिक निर्णय होता.

Kunal Kamra| Eknath shinde
Dhairyasheel Mane News : धैर्यशील माने यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी? आमदारांची मोट बांधण्याचे आव्हान...

मात्र येथे हातात संविधान घेऊन त्यांचे नेते आम्ही देशाला वाचवत असल्याचा दावा करतात. पण यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात देशाचे संविधान बदण्याची भाषा केली जातेय. आपण याचा निषेध करत असल्याचे खासदार माने म्हणाले. तर यावेळी त्यांनी कुणाल कामरावर जोरदार टीकाही केली.

खासदार माने यांनी कामरा याच्या डोक्याचा एक भाग मोकळा असून तो जोकर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गरळ ओकत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने व्यंग किंवा टीका होण्यापासून रोखण्यासाठी एखादी नियम करायला हवा अशी मागणी केली आहे. तर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा कामांवर बोललं पाहिजे असेही माने यांनी म्हटलं आहे.

Kunal Kamra| Eknath shinde
Dhairyasheel Mane : राहुल आवाडेंसाठी विधानसभेचा प्रचार करताना धैर्यशील मानेंना लोकसभेची चिंता?

तर सध्या कॉमेडीच्या नावाखाली काही लोक आपली राजकीय पोशळी भाजप असून ज्यात एक गांजा भूत देखील आहे. जो येथून स्क्रिप्ट लिहून देतो आणि तो जोकर तेथे महाराष्ट्रात शिंदेवर ते बोलत आहे. यामुळे अशा चॅनलवर बंदी घातली जावी. हेटस्पीचवर थांबण्यावर काम झालं पाहिजे, अशी मागणी करताना खतांच्या किंमतीवर लावलेल्या जीएसटीत कपात करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com