Tahawwur Rana
Tahawwur Rana Sarkarnama
देश

Tahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा 'मास्टरमाईंड' तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

सरकारनामा ब्यूरो

US Allow Tahawwur Rana Extradition : मुंबई २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूरचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आता एनआयए अमेरिकी सरकारच्या संपर्काच्या मदतीने तहव्वूरला लवकरच भारतात आणले जाणार आहे. मूळ पाकिस्तानी असलेला तहव्वूर राणा हा कॅनडाचा नागरिक आहे. त्याने लष्कराचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीसोबत २६/११ च्या हल्ल्याचा कट रचला होता. भारत सरकारच्या मागणीवरून तहव्वूरला अमेरिकेत अटक करण्यात आली होती.

भारताने (India) १० जून २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. तसेच तहव्वूर राणाला अटक करण्याची विनंतीही भारताने केली होती. त्यानुसार त्याला अटक करणण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेच्या (America) जो बायडेन प्रशासनाने राणाला भारतात पाठवण्यास पाठिंबा देत मान्यता दिली. भारत आणि अमेरिकेत दरम्यान प्रत्यापण करार आहे. त्या कराराअंतर्गत तहाव्वूर राण्याच्या प्रत्याप्रणाला मंजुरी मिळाली आहे. (America allows Extradition of Tahawwur Rana )

राणा हा २२/११ चा आरोपी डेव्हिड कोलमन (Devid Kolmon) हेडलीचा बालमित्र आहे. हेडली हा लष्कर ए तय्यबाशी जोडलेला असल्याची माहिती राणाला होती. तसेच हेडलीच्या कृत्यांसाठी मदत केल्याचा राणावर ठपका आहे. हेडलीच्या मीटिंग तसेच हल्ल्याचे संपूर्ण प्लॅनिंग याची माहिती राणाला असल्याचा संशय आहे. २६/११ च्या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.

४८ पानांचा न्यायालयाचा आदेश

यूएस जिल्हा न्यायालय सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या यूएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन केले. त्यांनी कागदपत्रांच्या आधारे युक्तिवादाचा विचार केला. यानंतर मंगळवारी (ता. १६) न्यायालयाने ४८ पानांच्या आदेशात तहव्वूर राणाला भारतात पाठवल्याची चर्चा होती. न्यायाधीश जॅकलिन चुलजियन यांनी आदेशात लिहिले की, कागदपत्रांचे पुनरावलोकन आणि विचाराच्या आधारे, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव राणाच्या प्रत्यार्पणाला परवानगी देतात. या हल्ल्यातील त्याच्या भूमिकेबद्दल भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती.

२६/११ हल्ल्यातील भूमिकेचा तपास 'एनआयए' करत आहे

भारताची राष्ट्रीय तपास संस्था (NIA) लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची चौकशी करत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे 'एनआयए'ने म्हटले आहे. सुनावणीत यूएस सरकारच्या वकिलांनी राणाला त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संघटनेत सामील असल्याची माहिती होती. राणा हेडलीला मदत करण्यात आणि त्याच्या कारवायांमध्ये सहभागी होता. त्याने हेडलीला वेळोवेळी आधार दिला. हेडलीने घेतलेल्या अनेक साथिदारांच्या भेटी, त्यांच्यातील चर्चा याबाबत राणाला माहिती असल्याचा युक्तवाद केला.

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT