Solapur News: भाजप नेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती स्थिर; 'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'

BJP News: मी आता जगण्याची लायकीची राहिली नाही.
Shrikant Deshmukh
Shrikant DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूरचे (Solapur) तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरुमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिलेला सध्या सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. (Self Harm attempt of a woman whose video with a BJP leader went viral)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन बदनामी करते म्हणून सांगोल्यातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने संबंधित महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिलेले आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Shrikant Deshmukh
Vinod Tawde News: भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, श्रीकांत देशमुख मी तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे. मी आता जगण्याची लायकीची राहिली नाही. माझ्याजागी दुसरी मुलगी असती तर तिने हे पहिलचं केलं असतं. भाजपच्या लोकांना कळावं म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.

माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील. भाजपच्या माणसाला सांगून माझ्यावर एक केस केली आहे. त्यामुळे मला हे सर्व अनावर झाले आहे, त्यातून मी माझे जीवन संपवत आहे, असे सांगून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Shrikant Deshmukh
Amol Kolhe On Bailgada Sharyat: पुन्हा भिर्रर सुरु..; न्यायालयाच्या निकालावर खासदार कोल्हे म्हणाले..

व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, मला कोणीही पाठिंबा दिलेला नाही. मदत मागितली, पण कोणीही मला मदत दिली नाही. युवा मोर्चामधील गणेश पांडे, दिवेकर, अमित शेलार, नील सोमय्या, दीपक ठाकूर, संतोष आव्हाड आणि इतर लोकांना माहिती आहे की मी कशी आहेत ते. आशिष शेलार आणि दिव्या ढोले यांनाही मी कशी आहे, ते माहिती आहे. माझा संसार होता. बीजेपीवाल्यांमुळे माझा संसार उद्‌ध्वस्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com