America VS Iran .jpg Sarkarnama
देश

US Attack : अमेरिका 'या' देशावर हल्ला करणार,लवकरात लवकर बाहेर पडा? केंद्र सरकारचं भारतीयांना नागरिकांना आवाहन

United States Attack Planing: अमेरिकेकडूनही इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या धर्तीवर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचमुळे केंद्र सरकारनं भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या सर्व वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Deepak Kulkarni

Iran News: गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका या दोन देशांमधील वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे.यामुळे जागतिक राजकारण चांगलंच तापलं आहे.इराणमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे. दिवसेंदिवस इराणमधील हिंसाचार वाढतच चालला असून तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, हिंसक निदर्शने आणि बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे,भारत सरकारने आपल्या नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे.

अमेरिकेकडूनही इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या धर्तीवर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचमुळे केंद्र सरकारनं भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या सर्व वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासानं उद्योजक, विद्यार्थी, पर्यटक, यांसह सर्वच नागरिकांना इराणला शक्य तितक्या लवकर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

इराणमध्ये जानेवारी 2026 मध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.गेल्या काही आठवड्यांपासून लाखो लोक इराणी सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरले आहेत.आत्तापर्यंत सुरक्षा दलांच्या कारवायांमध्ये तब्बल 2000 हून अधिक इराणी निदर्शकांना जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निदर्शकांसाठी मदत लवकर पोहोचत असं म्हणत कारवाईचे संकेत दिले होते. यामुळे अमेरिका इराणमध्ये लष्करी कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. जसे की हवाई हल्ले किंवा जमिनीवरील कारवाई,किंवा निर्वासित युवराज रेझा पहलवी इराणमध्ये परत येतील का,असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इराणमध्ये जून 2025 मध्ये निदर्शने सुरू झाली, पण या महिन्यात इराणी निदर्शकांच्या संतापाचा उद्रेक झाला. महागाई,भ्रष्टाचार आणि सरकारच्या कठोर धोरणांविरुद्ध लोक आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आहेत. इराणी सरकारनं निदर्शनं दडपण्यासाठी सुरक्षा दलांचा वापर केला,ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. इंटरनेट बंद असून सामान्य नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं निदर्शकांना फाशी दिली तर अमेरिका खूप कठोर कारवाई करेल,असा इशारा दिला आहे. इराणी सरकारने ट्रम्प यांच्या विधानांचे वर्णन राजकीय अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न म्हणून केले आहे.अमेरिकेशी संवादाचे दरवाजे खुले आहेत, परंतु त्यांनी अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्याची धमकीही तेहराननं म्हटलं आहे.

इराणची धोरणात्मक स्थिती कमकुवत आहे. इस्रायल आणि अरब देश अमेरिकेला इराणी सरकारला आणखी कमकुवत करण्यासाठी मोठे हल्ले करण्यासाठी पुढे करत आहेत. परंतु ट्रम्पची टीम लष्करी पर्यायांसह इतरही अनेक मार्गांचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे.

इराणविरुद्ध लष्करी हल्ल्याच्या पर्यायांची माहिती देण्यात आली आहे. अमेरिका हवाई हल्ले करू शकते, परंतु राजनैतिक तोडगा निवडण्यास प्राधान्य देईल,व्हाईट हाऊसने म्हटले आहे की ट्रम्प यांनी इराणी निदर्शकांना मदत येत आहे असे म्हणून प्रोत्साहन दिले. जी लष्करी किंवा इतर समर्थन दर्शवू शकते. ट्रम्प यांनी या परिस्थितीत स्वतःला अडकवले आहे, म्हणून हवाई हल्ल्याची शक्यता प्रबळ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT