Devendra Fadnavis : अजितदादांनी पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचा ठरलेला नियम का मोडला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

Why Ajit Pawar broke Mahayuti rule : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी महायुतीचा ठरलेला नियम का मोडला? यामागचं नेमकं कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा विजयाचा प्रवास सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने यापूर्वी कधीही न मिळालेले यश मिळवले असून, आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणूक प्रचारात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते एकमेकांविरोधात आक्रमक झाले.

एवढंच नव्हे तर,यावेळी अजितदादांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे टोकदार आरोप केले.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.पण महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीत मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही हा नियम ठरला होता.मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचा ठरलेला नियम का तोडला याविषयी भाष्य केलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: मुंबई महापालिकेत निकालानंतर गरज पडली तर ठाकरे बंधूंना सोबत घेणार? CM फडणवीसांचं मतदानापूर्वीच मोठं विधान

फडणवीस म्हणाले,एकमेकांवर टीका करायची नाही,हे ठरलेलं असतानाही अजितदादांकडून कदाचित निवडणुकीतील दबावापोटी किंवा प्रचाराच्या उत्साहात ही टीका झाली असावी. पण आम्ही त्यांच्या टीकेला विकासाच्या मुद्द्यांवर उत्तर दिले, असेही फडणवीस म्हणाले. महायुतीत कोणतीही फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत,ही सर्व चर्चा निराधार असल्याचेही सांगितले.ही विशेष मुलाखत त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली.

या मुलाखती दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा करत राज्यातील 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल आणि उर्वरित ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवेल, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
BJP Politics : कारवाईचा धडाका सुरूच; भाजपने माजी महापौरांसह २१ माजी नगरसेवकांना दाखवला बाहेरचा रस्ता!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीच्या उत्साहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून टीका झाली असली, तरी त्याला आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर उत्तर दिले, असेही फडणवीस म्हणाले. महायुतीत कोणतीही फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत, ही सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com