Smoke rises after a reported military strike during the US–Iran conflict, as tensions escalate in the Middle East war zone. Sarkarnama
देश

Israel iran conflict : इराणवरील हल्ल्यांसाठी अमेरिककडून भारतीय बंदरांचा वापर केल्याची चर्चा; अखेर पराराष्ट्र मंत्रालयाकडून भूमिका स्पष्ट

India ports us attack claim : अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर केल्याचं वक्तव्य अमेरिकेन लष्करातील माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वन अमेरिका न्यूज नेटवर्क या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाच्या तळांचा वापर केल्याचं ते म्हणाले आहेत.

Jagdish Patil

India Ports Claim Fact Check : अमेरिका-इस्रायल आणि इराण मधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाल्याने मध्य पूर्वेत मोठा संघर्ष पेटला आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराण देखील प्रतिहल्ले करत आहे.

अशातच या देशांच्या युद्धात भारताचं नाव ओढलं जात असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर केल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, आता या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्टीकरण भारताने दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर केल्याचं वक्तव्य अमेरिकेन लष्करातील माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वन अमेरिका न्यूज नेटवर्क या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाच्या तळांचा वापर करत असल्याचं दावा त्यांनी या मुलाखतीत केला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावल आहे. भारत सरकारने हा दावा एक 'प्रोपोगंडा' असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत 'फॅक्ट चेक' हँडलवरून हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, 'फेक न्यूजपासून सावध राहा! अमेरिकन चॅनलवर केले जाणारे हे दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि मनमानी आहेत. भारताने कधीही आपल्या भूमीवर परदेशी सैन्याला तळ ठोकण्याची परवानगी दिलेली नाही आणि आमचे धोरण आजही स्पष्ट आहे.' तर आम्ही तुम्हाला अशा निराधार आणि बनावट वक्तव्यांपासून सावध करतो, असंही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात इराणची युद्धनौका बुडवली असून या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत युद्धात हजारहून जास्त इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६५ शाळकरी मुलींचा समावेश आहे. त्यामुळे आता या देशांमधील संघर्ष आणखी पेटला असून सध्या तरी दोन्ही बाजूंनी माघार घेण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT