Rajya Sabha Election : शरद पवारांची बिनविरोध निवड धोक्यात? राज्यसभेसाठी शिंदेंची शिवसेना दोन उमेदवार देत आव्हान उभं करणार

Sharad Pawar Rajya Sabha Nomination : राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्याबाबतच चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Mar : अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर बुधवारी (ता.०४) महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी शरद पवारांना उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली. तर भाजपकडून 4 नावांची घोषणा करण्यात आली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

महायुतीच्या वाट्याला राज्यात 6 जागा आल्या आहेत. तर मविआच्या वाट्याला एकच जागा आली आहे. या एकमेव जागेवर जेष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मविआची जागा बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे.

कारण भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना प्रत्येकी एक अशा जागा लढवल्यास महाविकास आघाडीची जागा बिनविरोध विजयी होऊ शकते. मात्र, अशातच आता शिंदेंची शिवसेना दोन उमेदवार देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यामुळे शिवसेनेने राज्यसभेसाठी दोन उमेदवार दिल्यास शरद पवारांची सीट बिनविरोध होणं जवळपास अवघड मानलं जात आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली.

Sharad Pawar, Eknath Shinde
Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं भिजत घोंगड; CM फडणवीस घोषणा करणार, पण मुश्रीफांच्या मागणीचं काय?

या बैठकीत शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्याबाबतच चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे जर शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला तर शरद पवारांसाठी ते आव्हान ठरू शकतं. कारण उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता आहे. महायुतीला एकूण 232 आमदारांचा पाठिंबा आहे.

तर शिंदेकडे 20 अतिरिक्त मते आहेत. तर अजित पवारांच्या गटाकडे 3 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकी काय रणनीती आखणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, शिंदेंकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Sharad Pawar, Eknath Shinde
Ichalkaranji Crime : इचलकरंजी हादरली! जामिनावर सुटला अन् पोलिसांसमोरच ठोकला; प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, स्टेटस ठेवून बदला घेतला

मात्र शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, शायना एनसी यांची नावे खूप चर्चेत आहेत. यासह ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय मंडलिक हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कोणाला राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com