New Delhi News: तिसर्या महायुध्दाचा भडका उडाला की काय अशी युद्धजन्य व तणावपूर्ण परिस्थिती इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर करण्यात येत आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर निर्माण झाली आहे. इराणनं दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर या तीनही देशांमधील वाद एकदम टोकाला पोहोचला आहे. या हल्ले अन् प्रतिहल्ल्यानंतर विमानांची उड्डाणंही रद्द झाले आहे. यान तणावग्रस्त देशात भारतीय अडकून पडले आहेत. याचदरम्यान, आता संपूर्ण भारतीयांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे.
केंद्रातील मोदी सरकारनं देशातील इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचं सांगत नागरिकांना दिलासा दिला आहे. पण अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडे सध्या पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मात्र, भारताकडे सध्या कच्चे तेल आणि शुद्ध इंधनाचा 25 दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची बाब समोर येत आहे.
इराण देशाच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने 'होर्मुझ'ची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद करत असल्याचं अधिकृत जाहीर केलं आहे. जर त्या मार्गावरून कोणत्याही देशाकडून वाहन धाडण्यात आलं, ते पेटवण्यात येईल असा इशारा इराणने दिल्यामुळे अनेक देशांचं धाबं दणाणलं आहे.
जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा तेल व्यापाराचा भाग म्हणून या अरुंद समुद्री मार्गातून जातो. पण तोच इराणने रोखल्यामुळे तेल पुरवठा साखळीवर मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संबधित विमा कंपन्यांनी'होर्मुझ'ची सामुद्रधुनी असलेल्या पट्ट्यांवरील जहाजांचे संरक्षण कवच काढून घेतल्यामुळे तेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची मोठी धावपळ उडाली आहे. यामुळे अनेक टँकर्सला ऐनवेळी आपला रुट बदलावा आहे, ज्यामुळे वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
भारत सरकारनं याचवेळी देशातील इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचं स्पष्ट करत भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे भारतानं गेल्या काही वर्षांत तेल आयातीचे स्रोत बदलले आहेत. त्यामुळे आपल्या देशाचा तेल पुरवठा होर्मुझवर अवलंबून नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असूनही, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तूर्तास वाढण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.