

Karmala News: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करतानाच मराठा समाजातील लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं. पण सहा महिन्यांनंतरही कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या कार्यक्रमात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्याचं समोर आलं होतं. पण आंदोलनाच्या इशार्यानंतर जरांगे पाटलांनी तडकाफडकी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी करमाळा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करतानाच संपूर्ण मराठा समाजाला हादरवणार्या निर्णयाची घोषणा केली. जरांगेंनी त्यांचे नेहमी होणारे राज्यभरातील दौरे आगामी वर्षभरासाठी थांबवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले,मला मारण्याच्या धमक्या येत आहेत.तसेच त्यांना घात करून मारलं जाऊ शकतं. याच भीतीमुळे हा निर्णय घेत असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.माझ्या मराठा समाजासाठी लढतोय, मात्र मला रोज धमक्या येत आहेत.यात माझं कुटुंबही डावावर लागलं आहे.पण आपण मरणाला घाबर नसल्याचं त्यांनी सांगितलं.मी समाजासाठी एक नवी यंत्रणा उभी करण्याचं काम हाती घेतलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीदिनासाठी दाखल झाले होते.यावेळी त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, मी मरणाला घाबरत नाही.पण आता मला कार्यक्रमाला बोलवणं बंद करा.मला माझं काम करू द्या. मला कधी कुणी येऊन मारून टाकेल अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली. याच कारणास्तव जरांगेंनी त्यामुळे आता राज्यभरातील दौरे आगामी वर्षाभरासाठी थांबवणार आहे.
मनोज जरांगे यांनी यावेळी आपल्याला प्रत्येक 20 ते 22 दिवसांनी मला दवाखान्यात जावं लागतं असल्याची माहिती दिली. त्यामुळे सततच्या उपोषणामुळे शरीरात काही राहिलंच नसून हॉस्पिटलमध्ये नीटपणे (दुरुस्त) होत नाही. डॉक्टरांची टीम आली होती, त्यांनी सांगितलं की, तुम्हाला काय आजार असता तर मोठ्या दवाखान्यात नेलं असतं. पण माझ्या शरीरातच काही राहिलं नसल्यामुळे सलाईन तर कुठंवर लावावं. सलाईन लावायला शिरही सापडत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या काळात मराठा समाजातील यांच्या समर्थकांना मोठं मन ठेवण्याचा सल्लाही दिला. हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो. मी सप्ताह, लग्नाला आलो नाही, तर तुम्ही असं मोठं मन ठेवा, की मी नाही आलो तरी चालेल.पण तुमच्या लेकरांचं बसल्या ठिकाणावरून कल्याण करतो ना. बस्स झालं.दररोज दररोज पळावं लागत असल्यामुळे कामंही सुधारेनात मला. दररोज काहींना काही कार्यक्रम असतो. एकही दिवस असा जात नाही कार्यक्रम नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.