Former U.S. President Donald Trump speaks to the media about the ongoing US-Israel-Iran conflict, claiming Iran’s military power has been largely destroyed amid rising oil crisis concerns. Sarkarnama
देश

Donald Trump : युद्ध संपणार! डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा; म्हणाले, "हल्ला करण्यासाठी इराणमध्ये काहीच उरलं नाही, अवघ्या 3 तासांत..."

Donald Trump on US Israel Iran war: जवळपास मागील १३ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसत आहेत. कारण या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हे युद्ध कधी संपणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Jagdish Patil

US Israel Iran war: जवळपास मागील १३ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शिवा यअमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने देखील आक्रमकपणे अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले केले. इराणने काही आखाती देशांवरही हल्ले केले. याच युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसत आहेत. कारण या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हे युद्ध कधी संपणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना आता इराणला लक्ष्य करण्यासाठी प्रत्यक्षात काहीही शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. तसंच होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार व्यत्ययांमुळे कच्चे तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या चिंतेमुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

शिवाय ट्रम्प (Donald Trump) यांनी आपण इराणच्या लष्करी शक्तीचा खात्मा केल्याचा दावाही केला आहे. ते म्हणाले, "केवळ तीन तासांच्या कारवाईत इराणचं हवाई दल संपुष्टात आणलं आहे. इराणकडे आता काहीही उरलेलं नाही. त्यांच्याकडे ना नौदल आहे ना हवाई दल, आम्ही त्यांची लष्करी ताकद संपवली आहे. इराणकडील ८० टक्के क्षेपणास्त्र आणि लाँचर्स नष्ट केले आहेत."

दरम्यान, ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचं समर्थन करताना इराणने इस्राइल वर अण्वस्त्र हल्ला केला असता असा दावा केला आहे. इराण इस्त्राइल विरोधात अण्वस्त्र वापरणार होता. आपण आत गेलो नसतो तर ते आपल्या मागे आले असते.

आठवडाभरात ते आपल्यावर १०० टक्के हल्ला करणार होते, असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान, आता ट्रम्प यांच्या दाव्यावर इराण नेमकं काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT