Farooq Abdullah Firing : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, लग्न समारंभातून बाहेर पडताच झाडल्या गोळ्या

Farooq Abdullah firing incident latest news: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला एका लग्न समारंभात उपस्थित राहिले होते. लग्न आटोपून ते माघारी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेचं थराराक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Farooq Abdullah Firing
Security personnel detain the suspect after the firing incident targeting Farooq Abdullah in Jammu’s Greater Kailash area, as seen in CCTV footage.Sarkarnama
Published on
Updated on

Farooq Abdullah Attack: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फारूक अब्दुल्ला एका लग्न समारंभात उपस्थित राहिले होते. लग्न आटोपून ते माघारी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेचं थराराक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

गोळीबारानंतर लगेचच आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्लेखोराचं नाव कमल सिंह जमवाल असं असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत.

Farooq Abdullah Firing
Prakash Ambedkar: RSSच्या कार्यालयावर मोर्चाची प्रकाश आंबेडकरांकडून तयारी सुरु; म्हणाले, कोणीही यावं अन् मोदींना...

मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला हे बुधवारी (ता.11) जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभासाठी गेले होते. यावेळी लग्न समारंभ आटोपून माघारी जात असताना हल्लेखोराने मागून त्यांच्या मानेवर बंदुक ठेवली आणि गोळीबार केला. मात्र, सुदैवाने त्यांना ती गोळी लागली नाही.

यावेळी अब्दुला यांच्या अंगरक्षकांसह सोबत असलेल्या लोकांनी हल्लेखोराला पकडलं आणि ताब्यात घेतलं. गोळीबारानंतर हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी पकडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा हल्ला झाला त्यावेळी अब्दुल्ला यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. या हल्ल्यात चौधरी यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com