इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर तणाव वाढला आहे.
इराणकडून अमेरिकेच्या शेजारील देशांतील सैन्य तळांना लक्ष्य केले जात असून आखाती देशांमध्ये अस्थिरता वाढली आहे.
शाळेवरील हल्ल्याच्या व्हिडीओनंतर जगभरात संतापाची लाट उसळली असून इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
israel iran war airstrike on school : अमेरिका-इस्रायलने आणि इराण यांच्यातील युद्ध अधिकच भडकले असून इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढला वाढला आहे. याचे परिणाम जगावर होत असून भारतातील पर्यटक आणि आखाती देशात कामासाठी गेलेले लाखो भारतीय नागरीक अडकले आहेत. सध्या इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले चढवले आहेत. त्याला प्रत्युत्तर देत इराणकडून अमेरिकेला मदत करणाऱ्या शेजारील देशातील अमेरिकेच्या बेस पोईंटला लक्ष केले जात आहे.
यामुळे शेजारील मुस्लिम देशांमध्ये तणाव वाढला असून जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आल्याचे बोलले जात आहे. मात्र या युद्धाची किमत निष्पाप लहानग्या जिवांना मोजावी लागत आहे. असाच एक व्हिडीओ इराणकडून समोर आला असून ज्यात शाळाच निष्पाप विद्यार्थिनींचे कबरस्तान बनले आहे. यावरून आता संपूर्ण जगभरात संपात उसळला असून इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या प्रमुख शहरांमध्ये जोरदार हल्ले केली जात आहेत. यादरम्यानच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून ज्याने अख्ख्या जगाचे मन हेलावून टाकले आहे. मानवतेला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना ही असून ती दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील आहे.
येथे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात 'शजारेह तय्येबा' या मुलींच्या प्राथमिक शाळेला लक्ष्य करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या हल्ल्यात 160हून अधिक निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. तर वर्चस्व वादाच्या या युद्धात मात्र निष्पाप विद्यार्थिनींचा बळी गेला आहे.
याबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सामूहिक थडग्यांचे फोटो शेअर केला आहे. ज्यात चिमुकल्याच्या सामुहिक कबरी काढण्यात आल्याचे दिसत असून एकाच वेळी कबरी काढण्यासाठी जेसीबींचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. तर त्या निष्पाप चिमुकल्यांचा सामुहीक दफनविधी होत असल्याचे दिसत आहे.
यावरून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय. तसेच आता 'शजारेह तय्येबा' या मुलींच्या प्राथमिक शाळेच्या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ जसे समोर येत आहेत तसे जगभरातून संतापाची लाट उसळतेय. तर ट्रम्प प्रशासनाच्या या अमानवीय कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
1. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष का वाढला?
अमेरिकेच्या सहभागामुळे आणि हवाई हल्ल्यांमुळे तणाव अधिक भडकला आहे.
2. भारतीय नागरिकांवर याचा कसा परिणाम झाला आहे?
आखाती देशांमध्ये कामासाठी गेलेले आणि पर्यटक म्हणून गेलेले अनेक भारतीय अडकले आहेत.
3. इराणने कोणाला लक्ष्य केले आहे?
इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या शेजारील देशांतील अमेरिकन सैन्य तळांना लक्ष्य केले आहे.
4. शाळेवरील हल्ल्याबाबत काय माहिती आहे?
हल्ल्यात निष्पाप विद्यार्थिनींचा बळी गेला असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
5. जगभरात संताप का उसळला आहे?
नागरिकांवर आणि शाळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मानवतावादी संकट निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.