iran israel war : इराण-इज्राइल अमेरिका युद्धाचा मार्केटला धक्का: महाराष्ट्रालाही चटके, सुकामेव्याचे दर भडकले; ग्राहकांमध्ये महागाईची धास्ती

iran israel war impact on kolhapur market : इस्त्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढल्यानंतर हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. उड्डाणे रद्द करण्यात आली असून समुद्री वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे इराण पोर्ट देखील बंद करण्यात आला आहे.
iran israel war impact on kolhapur market
iran israel war impact on kolhapur marketsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. इराण मधील पोर्ट बंद झाल्याने भारतात येणारे सुकामेवा व मसाल्यांचे कंटेनर अडकले आहेत.

  2. कोल्हापूर बाजारात पिस्ता, खजूर आणि शहाजिरे यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  3. पेट्रोल-डिझेल तसेच सोने-चांदी दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये महागाईची भीती वाढली आहे.

dry fruits, petrol diesel gold silver rate Rise in kolhapur market : इराण पोर्ट बंद झाल्याने तेथून भारतात आयात होणाऱ्या सुकामेवा, मसाल्याचे कंटनेर अडकले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापूरच्या बाजारपेठेत पिस्ता, खजूर असा सुकामेवा, शहाजिरे या सारख्या मसाल्यांच्या प्रतिकिलो दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, सोने-चांदीच्या दरवाढीची ग्राहकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

इराण येथून पिस्ता, खजूर, तर अफगाणिस्तानमधून काळा मनुका, अंजीर, बेदाणा, जर्दाळू, शाहजिरे, आदींची आयात भारतासह कोल्हापुरात होते. पूर्वी अफगाणिस्तानमधील सुकामेवा पाकिस्तानमधून भारतात येत होता.

मात्र, पाकिस्तानची सीमा भारताने बंद केल्याने अफगाणिस्तान येथील सुकामेवा हा इराण पोर्टच्या माध्यमातून भारतामध्ये आणला जात होता. आता इराण आणि अमेरिका-इस्त्राईल यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याने इराण पोर्ट बंद झाले आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्या सुकामेवा, मसाल्याचे कंटनेर अडकून पडले आहेत. त्यासह पुढील खरेदीची नोंदणीदेखील ठप्प झाली आहे.

iran israel war impact on kolhapur market
US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धात भारत कोणाच्या बाजूने? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका; "इराण आणि..."

या तणावाच्या स्थितीतच गेल्या दोन दिवसांत सुकामेवा, मसाल्यांचे दर वाढले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात वेगाने वाढ झाली. कोल्हापूर सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख ६४ हजार ७०० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलोचा दर दोन लाख ८६ हजार रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, युद्धाचा कालावधी वाढल्यास पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीबरोबर धान्य, वाहतूक भाडे आदींच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुकामेव्याची कमतरता जाणवणार

‘इराण पोर्ट बंद झाल्याने सध्या अफगाणिस्तान, इराणमधून येणारा सुकामेवा, मसाल्याची आयात थांबली आहे. आयात थांबल्याने टंचाई निर्माण होणार आहे. या परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांत दहा ते पंधरा टक्क्यांनी सुकामेव्याचे दर वाढले आहेत. युद्ध लवकर थांबले नाही, तर सुकामेव्याची कमतरता जाणवणार असून, दर आणखी वाढण्याची शक्यता सुकामेव्याचे व्यापारी चिंतन शाह यांनी व्यक्त केली.

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

‘सध्या कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, दरदेखील स्थिर आहेत. लगेच काही दर वाढण्याची शक्यता नाही. मात्र, इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाचा कालावधी वाढल्यास आपली चिंता निश्चितपणे वाढणार आहे. त्याबाबतचे चित्र येत्या दोन दिवसांत अधिक स्पष्ट होईल’, असे पेट्रोल-डिझेलचे विक्रेते गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

iran israel war impact on kolhapur market
Israel Iran War : इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; तणावपूर्ण स्थितीत भारतीय दूतावासांकडून हेल्पलाईन जारी

FAQs :

1. दरवाढीचे मुख्य कारण काय आहे?
इराण पोर्ट बंद झाल्यामुळे सुकामेवा आणि मसाल्यांची आयात अडकली आहे.

2. कोणत्या वस्तूंचे दर वाढले आहेत?
पिस्ता, खजूर आणि शहाजिरे या वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

3. कोणत्या बाजारपेठेत परिणाम दिसून आला आहे?
कोल्हापूरच्या घाऊक बाजारपेठेत दरवाढ स्पष्टपणे दिसत आहे.

4. ग्राहकांमध्ये चिंता का वाढली आहे?
इंधन आणि सोने-चांदी दरवाढीमुळे एकूण महागाई वाढण्याची शक्यता आहे.

5. पुढे दर आणखी वाढू शकतात का?
आयात सुरळीत न झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com