Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump : अमेरिकेला श्रीमंत करणारी ट्रम्प खेळी; 5 दशलक्ष डॉलर्समध्ये विकायला काढलं अमेरिकेचं नागरिकत्व!

America Gold Card Scheme : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची पुन्हा एकदा सुत्रं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आली आहेत. सत्तेत येताच त्यांनी भारतासह अनेक देशांना बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करत धक्का दिला होता.

Aslam Shanedivan

Pune News : पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असून त्यांनी सत्तेत येताच अनेक बदल केले आहेत. तर सत्तेत येताच मोठ्या संख्येने बेकायदेशीर अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांना हद्दपार करत भारतासह अनेक देशांना धक्का दिला. भारत, ब्राझील, मेक्सिको आणि पाकिस्तानसह अनेक देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. तेही हातापायात बेड्या ठोकून. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. ही टीका शांत होते न होते तोच आता त्यांनी नवी घोषणा करत अमेरिकेचं नागरिकत्व विकायला काढलं आहे. यासाठी नवीन गोल्ड कार्ड योजना सुरू केली आहे. यामुळे आता कोणत्याही देशातील धनदांडग्या व्यक्तीला सहजपणे अमेरिकन नागरिकत्व मिळणार आहे.

गोल्ड कार्ड व्हिसा योजनेअंतर्गत, श्रीमंत परदेशी नागरिकांना 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला (43,53,98,750 भारतीय रूपये) विकत घ्यावे लागणार आहे. ही योजना सध्याच्या EB-5 व्हिसाच्या जाणी येणार असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत नियम असा होता की जर कोणत्याही परदेशी व्यक्तीला अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्याला गुंतवणूक करून रोजगार निर्माण करावा लागत होता. पण आता थेट 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देवून अमेरिकेचं नागरिकत्व घेता येणार आहे.

(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

ट्रम्प काय म्हणाले?

ओव्हल येथील कार्यालयात वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, "आम्ही एक गोल्ड कार्ड योजना आणत आहोत. जे इतर देशातील नागरीकांना अमेरिकेचं नागरिकत्व देईल. सध्या जे ग्रीन कार्ड आहे, तेच गोल्ड कार्ड आहे. पण आता याची किंमत सुमारे 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असेल आणि ते ग्रीन कार्डमधील सर्व सेवांसह काही अतिरिक्त सुविधा मिळतील. जी दोन आठवड्यात सुरू होईल, असेही ट्रम्प म्हणाले.

नव्या गोल्ड कार्ड योजनेमुळे जगभरातील श्रीमंत लोक आपल्या देशात येतील. ते येथे अधिक श्रीमंत आणि यशस्वी होतील. आपला व्यवसाय उभारतील, लोकांना रोजगार देतील. यातून आपल्या देशाला कर मिळेल, असेही ट्रम्प यांनी योजनेच्याबाबतीत सांगितलं आहे.

EB-5 कार्यक्रमाला फटका

नव्या गोल्ड कार्ड योजनेमुळे जुन्या EB-5 योजनेला फटका बसण्याची शक्यता आता अमेरिकसह जगभरात व्यक्त केली जातेय. नवी योजना जुन्या EB-5 योजनेच्या जागी येणार असून यामुळे जगभरातील नव उद्योजकांना गुंतवणूक करून ग्रीन कार्डच्या मदतीने थेट अमेरिकत जाता येत होते. पण आता नव्या गोल्ड कार्ड योजनेमुळे गुंतवणूकदारांना मिळणारे ग्रीन कार्डच थांबणार आहे. यामुळे भविष्यात EB-5 कार्यक्रमच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT