Donald Trump: ट्रम्प यांचा पुन्हा मोठा झटका; प्रशासनाची झोप उडवली, लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला 16 महिन्यांतच हटवलं

Donald Trump Big Decisions : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सध्या रोज नवे आणि तितकेच बेधडक निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे जगातील अनेक देश धास्तावले आहेत. जगभरातील देशांनाच नव्हे तर अमेरिकेतील नागरिकांसाठीही हे निर्णय धक्का देणारे आहेत.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump News : अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सध्या रोज नवे आणि तितकेच बेधडक निर्णय घेत आहे. त्यांच्या निर्णयामुळे जगातील अनेक देश धास्तावले आहेत. जगभरातील देशांनाच नव्हे तर अमेरिकेतील नागरिकांसाठीही हे निर्णय धक्का देणारे आहेत. त्यांच्या एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अशातच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एक संपूर्ण अमेरिकेची झोप उडवणारा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी शुक्रवारी (ता.21) रात्री देशाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवले आहेत. त्यामुळे अमेरिकच्या लष्कर आणि अधिकाऱ्यांची अक्षरश: धाबे दणाणले आहेत. ट्रम्प यांच्या एकापाठोपाठच्या धडाकेबाज निर्णयांमुळे प्रशासन, नोकरदार,व्यावसायिक यांसह सर्वच यंत्रणा प्रचंड हादरल्या आहेत.

अमेरिकेचे (America) डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राउन ज्युनियर असून ते लष्कराचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चार्ल्स सी.क्यू. ब्राउन ज्युनियर यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेन संरक्षण खात्यातील सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समूह हा JCS हा यूएस संरक्षण विभागातील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समूह आहे. राष्ट्राध्यक्ष,संरक्षण सचिव, होमलँड सिक्युरिटी कौन्सिल आणि नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल यांना लष्करी बाबींबाबत सल्ला देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार त्यांच्याकडे असते.

Donald Trump
Shivsena UBT : "ठाकरेंच्या शिवसेनेत संवाद नाही, केवळ चाटूकारांची फौज..."; प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेल्या तिवारींचा राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल

लष्कराचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष म्हणून चार्ल्स सी.क्यू.ब्राउन यांच्या जागेवर आता हवाई दलाचे निवृत्त जनरल डॅन केन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी केन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.आणखी 5 अधिकारी बडतर्फ, नावे जाहीर केलेली नाहीत.

चार्ल्स सी.क्यू.ब्राउन ज्युनियर यांच्यासह संरक्षण विभागातील आणखी 5 अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन टम्प यांनी हटवलं आहे. नौदलच्या ॲडमिरल लिसा फ्रँचेट्टी,हवाई दलाचे उपप्रमुख जेम्स स्लाइफ,लष्कर,हवाई दल आणि नौदल अशी तीनही खात्यांच्या तीनही वरिष्ठ वकिलांचा समावेश आहे. या मोठ्या निर्णयामुळे प्रशासनात मोठा गोंधळ उडाला आहे.

Donald Trump
Shivraj Singh Chouhan : केंद्रीय मंत्र्यांचा तुटक्या सीटवरून प्रवास; Air India वर माफीची नामुष्की

डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ल्स सी.क्यू.ब्राउन यांना जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (JCS) चेसीएस या पदावरुन हटवण्यामागची कारणही चर्चेत आलं आहे.त्यात ब्राउन त्यांनी 2020 मध्ये ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला जाहीरपणे पाठिंबा दर्शवला होता.याच चळवळीचा ट्रम्प यांना 2020 च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं दिसून बोललं जात होतं.

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर ही चळवळ सुरू झाली.चार्ल्स सी.क्यू.ब्राउन तेव्हा हवाई दलाचे चीफ ऑफ स्टाफ होते.त्यावेळी ट्रम्प अध्यक्षपदावर होते.ब्राउन हे त्यावेळी हवाई दलाचे चीफ ऑफ स्टाफ होते.डोनाल्ड ट्रम्प आणि डॅन केन यांची या दोघांची 2018 मध्ये इराक येथे भेट झाली होती.

ट्रम्प यांच्या फेव्हरमधले अधिकारी म्हणून केन यांच्याकडे पाहिले जात होत्.त्यांच्या ट्रम्प यांच्यासाठी आपण प्राणाची आहुती देऊ शकतो.असा निर्णयही ट्रम्प यांनी तत्कालीन जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले होते.सरकार बदलल्यावर जेसीएसचे अध्यक्ष बदलत नाहीत.पण आता सीक्यू ब्राउन केवळ 16 महिन्यांतच त्यांना हटवण्यात आले आहेत.

Donald Trump
SSC Exam Paper Leak : दादा भुसे 'अ‍ॅक्शन मोड'वर, पेपर फोडणाऱ्यांवर उगरला कायद्याचा दंडुका; गुन्हा दाखल, शिक्षण विभागात खळबळ

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या ऑफरने मोठा उलथापालथ झाली आहे. ट्रम्प यांनी सरकारवरील बोजा कमी करण्यासाठी काटकसर सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना बायआऊटची ऑफर दिली आहे. बायआऊट याचा अर्ज स्वत:हून नोकरी सोडणे. आश्चर्य म्हणजे ट्रम्प यांच्या या ऑफरवर कर्मचाऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांनी ही ऑफर स्वीकारत नोकरीचा राजीनामा दिला आहे.

कर्मचाऱ्यांवर नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केली यांनी केला आहे. दरम्यान,ट्रम्प सरकारचे तब्बल 30 लाख कर्मचारी आहेत.अमेरिकेतील ही 15 वी सर्वात मोठी कर्मचारी संख्या आहे.ट्रम्प यांच्या धोरणानुसार आता खर्चात कपात करून अधिकाधिक खर्च नागरिकांच्या सुविधांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com