Donalt Trump, Gurpatwant Singh Pannun Sarkarnama
देश

Donald Trump Oath : भारताचा शत्रू ट्रम्प यांच्या शपथविधीला; दहशतवाद्याच्या व्हिडिओने खळबळ

Gurpatwant Singh Pannun Us President Oath Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते.

Rajanand More

New Delhi News : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला जगभरातून अनेक पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारताचा शत्रू व वाँटेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनेही हजेरी लावल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडिओच सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तिकीटांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पन्नू सोहळ्याला उपस्थित राहिला का, अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार, पन्नू हा तिकीट खरेदी करून शपथविधीला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमध्ये पन्नू हा स्टेजजवळच खलिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी करताना दिसत आहे. यावेळी स्टेजवर डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानियाही दिसत आहेत. यावेळी ट्रम्प यांचे समर्थक यूएस, यूएस अशा घोषणा देत होते. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियामध्ये पन्नूला ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची परवानगी कशी मिळाली, असा सवाल केला जात आहे. 

काँग्रेसनेही यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, खलिस्तानी गुपतवंत सिंह पन्नूला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लिबर्टी हॉलमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले. पन्नू खलिस्तानचा जयघोष करताना दिसून आला.

भारत सरकार केवळ मूकदर्शक बनून राहणार की त्यावर आक्षेप नोंदवणार, असा सवाल श्रीनेत यांनी केला आहे. आपल्या देशाच्या अखंडतेविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचा अमेरिकेकडून सत्कार करणे योग्य आहे का? पंतप्रधान मोदी अदानींना वाचवण्यासाठी ही किंमत मोजायलाही तयार आहे का, असा सवालही श्रीनेत यांनी केला आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT