Nitish Kumar: जी भीती होती तेच घडलं; नितीश कुमारांची पलटी मारण्यास सुरुवात; भाजप सरकारचा पाठिंबा काढला

NDA Government And JDU News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवल्यानंतरही भाजपने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमारांना संधी देणार नाही अशी शंका जनता दल युनायटेडच्या नेत्यांच्या मनात आहे.
Nitish Kumar - bjp .jpg
Nitish Kumar - bjp .jpgSarkarnama
Published on
Updated on

Manipur News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं.आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रात भाजपसोबत (BJP) सत्तेत असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नेते नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, जोमोदी शाहांसाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. मणिपूर विधानसभेत जनता दल युनायटेडचा फक्त आमदार आहे.

60 जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपकडे 32 जागा मिळवून बहुमतासह सत्तेत आहे. त्याचसोबत नितीश कुमारांचा जेडीयू पक्षाच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे 5 आमदार भाजपने गळाला लावले. आता मणिपूरमध्ये जेडीयूकडे अवघा एकच आमदार शिल्लक आहे. तरीही मणिपूरमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सरकारमध्ये सामील होते. पण आता त्यांच्या पक्षाने भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Nitish Kumar - bjp .jpg
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीचं ठरलं! विधानसभेचे विरोधीपक्ष नेते पद उद्धव ठाकरेंच्या पक्षाला, तर परिषदेत काँग्रेस

मागील दोन वर्षांपासून हिंसाचारानं धगधगत राहिलेल्या मणिपूरवरुन केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकार सध्या बॅकफूटला गेले आहेत.एकीकडे मणिपूरवरुन विरोधकांचा दबाव वाढत असतानाच नितीश कुमारांनी भाजपसोबत काडीमोड घेण्याचा निर्णयामुळे मोदी- शाहांसाठी धोक्याची घंटा आहे.

मणिपूरमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं पाठिंबा काढून घेतल्यानं भाजप सरकार संकटात सापडणार नाही. पण याच वर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या निर्णयाकडं महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे. बिहारमध्ये जागावाटपासाठी भाजपवर दबाव आणण्यासाठी नितीश कुमारांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nitish Kumar - bjp .jpg
Abdul Sattar News : पालकमंत्री शिरसाट यांचे आव्हान अन् किरीट सोमय्या यांचा सिल्लोड मध्ये हस्तक्षेप; तरी अब्दुल सत्तार गप्प का!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तेथील आरजेडी,जेडीयू,प्रशांत जनसुराज या प्रादेशिक पक्षांसह भाजप (BJP), काँग्रेससह राष्ट्रीय पक्षांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवल्यानंतरही भाजपने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमारांना संधी देणार नाही अशी शंका जनता दल युनायटेडच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे नितीश कुमार बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Nitish Kumar - bjp .jpg
Sharad Pawar News : शरद पवारांनी संभाव्य संकटाबाबत सरकारला केले सतर्क; म्हणाले, ही चिंतेची व गंभीर बाब!

मात्र बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. एनडीएचे नेतृत्व नितीश कुमारच करतील असं सांगितलं आहे. या सर्व चर्चा सुरू असताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे बंद असल्याचं वक्तव्य केलं आहे.  

मागच्यावेळी घटलेल्या जागा भरुन काढत बिहारमध्ये सर्वात मोठा ठरण्यासाठी नितीश कुमार आत्तापासूनच तयारीला लागले आहे. 2020 च्या निवडणुकीत सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या आरजेडीसह भाजपलाही धोबीपछाड देण्यासाठी मोठे डाव टाकणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com