Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑफर अन् तब्बल 40 हजार कर्मचाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

America President Decision buyout offer US Government : डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेत आहेत.

Rajanand More

Workers resigned News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या दररोज नवनवे आदेश देत जगातील अनेक देशांना हादरे देत आहेत. एवढेच नाही तर अमेरिकेतील नागरिकांसाठीही ते धडाकेबाज निर्णय घेत आहेत. त्यांच्या एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या ऑफरने मोठा उलथापालथ झाली आहे.

ट्रम्प यांनी सरकारवरील बोजा कमी करण्यासाठी काटकसर सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना बायआऊटची ऑफर दिली आहे. बायआऊट याचा अर्ज स्वत:हून नोकरी सोडणे. आश्चर्य म्हणजे ट्रम्प यांच्या या ऑफरवर कर्मचाऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांनी ही ऑफर स्वीकारत नोकरीचा राजीनामा दिला आहे.

ऑफर स्वीकारण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. अमेरिकेतील कामगार विभागाने घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यास सांगितले होते. आता हे कर्मचारी आठवड्यातील पाच दिवस कार्यालयात काम करतील. तर नोकरीचा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याचेही सांगितले जात आहे.

काय आहे ऑफर?

ट्रम्प सरकारच्या ऑफरनुसार, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी आठ महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. तसेच निश्चित भत्ताही देण्यात येणार नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडणे पसंत केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयालाही काही प्रमाणात विरोधही होत आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पॉईज यूनियनचे अध्यक्ष एवरेट केली यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्यांवर नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केली यांनी केला आहे. दरम्यान, ट्रम्प सरकारचे तब्बल 30 लाख कर्मचारी आहेत. अमेरिकेतील ही 15 वी सर्वात मोठी कर्मचारी संख्या आहे. ट्रम्प यांच्या धोरणानुसार आता खर्चात कपात करून अधिकाधिक खर्च नागरिकांच्या सुविधांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT