Donald Trump News : अखेर ट्रम्प यांनी दणका दिलाच; महाराष्ट्रातील तिघांसह 104 भारतीयांना अमेरिकेतून काढलं बाहेर...

Illegal immigration in the USA Trump immigration policy : बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना घेऊन पहिले विमान आज अमेरिकेतून भारतात दाखल झाले.
Illegal Indian Immigrants
Illegal Indian ImmigrantsSarkarnama
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतीयांनाही दणका दिला. अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या इतर देशांतील नागरिकांना परत मायदेशी पाठवले जात आहे. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. आज 100 हून प्रवाशांना घेऊन एक विमान भारतात दाखल झाले. यामध्ये तीन महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. पुढील काळात आणखी बेकायदेशीर भारतीयांना भारतात पाठवले जाणार आहे.

अमेरिकी हवाई दलाचे C-17 विमान आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अमृतसरमध्ये दाखल झाले. अमेरिकेने आतापर्यंत सुमारे 18 हजार बेकायदेशीर भारतीयांची ओळख पटवली असून त्यांना भारतात पाठवले जाणार आहे. पहिल्या विमानाने 104 भारतीय आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवासी गुजरात, पंजाब आणि हरियाणातील आहेत.   

Illegal Indian Immigrants
Donald Trump News : इराणने माझी हत्या केली तर..! ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ, अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश...

महाराष्ट्रातीलही तीन प्रवाशांचा समावेश असून उत्तर प्रदेशमधीलही तीन प्रवासी आहेत. हरियाणा व पंजाबमधील प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून त्यांच्या राहत्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. तर इतर प्रवाशांना विमानाने संबंधित राज्यातील रवाना केले जाईल, असे समजते. याबाबत ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिले आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याबाबत स्पष्टता नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यानंतर स्थलांतरितांना देशातील बाहेर घालवण्याच्या आदेशावर सही केली होती. त्यानंतर त्यांनी ही मोहिमच हाती घेत कोट्यावधी रुपये खर्च करून आतापर्यंत हजारो स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवले आहे. ट्रम्प यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी त्यांनी स्थलांतरितांबाबत भारत सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Illegal Indian Immigrants
BJP Politics : भाजपच्या बड्या नेत्यावर भीक मागण्याची वेळ, ‘बुलेट दा’चे फोटो व्हायरल होताच उडाली खळबळ

अमेरिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांची पडताळणी करून त्यांना घरी पाठवले जाणार आहे. पासपोर्ट नसलेल्या नागरिकांना अमेरिकेतील दुतावासाकडून एक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र भारतात आल्यानंतर काढून घेतले जाईल. पहिल्या विमानाने भारतात आलेल्या नागरिकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एकही प्रवासी नाही. तसेच त्यांना ताब्यात घेण्याबाबतही कोणत्याही सुचना नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com