Gautam Adani Sarkarnama
देश

Gautam Adani : अमेरिकेत खटला दाखल होताच अदानींनी घेतला मोठा निर्णय; शेअर बाजारात भूकंप  

Adani companies face stock market shakeup after US case filed: अमरिकेतील गौतम अदानींच्या एका कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Rajanand More

New Delhi : उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेते मोठा झटका बसला आहे. त्यांच्या एका कंपनीवर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे आणि एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित असल्याचे समजते.

अमेरिकेत खटला दाखल करण्यात आल्यानंतर अदानी ग्रुपने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अदानी ग्रुपकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अमेरिकन न्याय विभाग आणि सिक्युरिटीस अन्ड एक्सचेंज कमिशनने आमच्या बोर्डचे सदस्य गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. न्यूर्याकमधील अमेरिकी जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने आमच्या बोर्डचे सदस्य विनीत जैन यांचाही त्यात समावेश केला आहे. या घटनेमुळे आमच्या कंपनींनी सध्या प्रस्तावित अमेरिकी डॉलर डॉमिनेटेड बॉन्ड ऑफरिंग (USD Denominated Bond Offerings) ही योजना रद्द करण्यात आल्याचे अदानी ग्रीन कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी 600 मिलियन डॉलरचे बॉन्ड रद्द केले आहेत.

अदानींचे शेअर कोसळले

अदानींवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांच्या बहुतेक कंपन्यांचे शेअर कोसळले आहे. अदानी ग्रीन एनर्जीसह स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड सर्व दहा कंपन्यांचे शेअर्समध्ये जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरूवारी शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच अदानींच्या शेअर्सची घसरण सुरू झाली. ती अजूनही थांबलेली नाही.

का दाखल झालाय खटला? 

गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये फसवणुकीचा तसेच लाच दिल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. अमरिकेतील त्यांच्या एका कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 2236 कोटी रुपयांची लाच देण्याचा तसेच हे प्रकरण लपवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप आहे. या कॉन्ट्रॅक्टमधून पुढील वीस वर्षांत दोन अब्ज डॉलरचा फायदा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यासाठी खोटे दावे करून कर्ज आणि बॉन्ड्सची जुळवाजुळव करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT