Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump Tariff : दोस्तीत कुस्ती! PM नरेंद्र मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर टॅरिफ हल्ला, तब्बल 26 टक्के कर लावला

Donald Trump announces tariffs PM Narendra Modi : भारतातून अमेरिकेत आयात गेल्या जाणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. पण भारत अमेरिकेसोबत योग्य वागत नाही.

Roshan More

Donald Trump News : जागतिक राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख आपला मित्र म्हणून करत असतात. ट्रम्प हे देखील पंतप्रधान मोदी हे आपले मित्र असल्याचे सांगतात. मात्र, ही मैत्री देखील अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) रोखू शकली नाही.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभारातील देशांवर टॅरिफ लावत असल्याचे घोषणा केली. त्यामध्ये भारतावर तब्बल 26 टक्के टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर, सर्वाधिक टॅरिफ हे चीनवर 34 टक्के लावण्यात आले आहे.

भारतातून अमेरिकेत आयात गेल्या जाणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. पण भारत अमेरिकेसोबत योग्य वागत नाही. अमेरिकडून आयात केल्या जाणारा वस्तुंवर भारतात 26 टक्के कर लादला जातो. आत्ता त्याबदल्यात आम्ही त्यांच्यावर 26 टक्के कर लादत आहोत.

जगभर फटका

अमेरिका हे जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन समजले जाते. आत्तापर्यंत अमेरिकेची भूमिका ही विकसनशील राष्ट्रांना मदत करण्याची होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करून जगभर होणारी मदत थांबवली आहे.तसेच अमेरिकेवर कर लादणाऱ्या देशांना टॅरिफ लावले आहे. त्याचा फटका जगभरातील देशांना बसणार आहे.

कोणत्या देशावर किती आयात शुल्क

अमेरिकेने आपल्या आयात शुल्क धोरणात दोन एप्रिलला मोठे बदल केले. त्यामुळे हा दिवस अमेरिका 'लिबरेशन डे' म्हणून साजरा करणार आहे. अमेरिकेने चीनवर सर्वाधिक 34 टक्के टॅरिफ लावले आहे. तसेच युरोपातील देशांना 20 टक्के, जपानला 24 टक्के, दक्षिण कोरियाला 25 टक्के, स्वित्झर्लंडकडून 31 टक्के, युनायटेड किंग्डमकडून 10 टक्के भारताला 26 टक्के टॅरिफ लावला आहे.

भारतातील 'या' क्षेत्रांवर परिणाम?

तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने टॅरिफमध्ये केलेल्या बदल्यांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होणार आहे. भारतातामध्ये प्रामुख्याने मौलवान खडे, वैद्यकीय साहित्य, कृषीचे साहित्य, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT