Waqf Amendment Bill : "ते खोटे मुस्लिम आहेत..."; वक्फ दुरूस्ती विधेयकावर बोलताना अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

Abu Azmi On Waqf Amendment Bill : "सरकारमधील लोकांना मुस्लिमांचा अपमान करण्याची सवय असून मुस्लिमांचा अपमान आणि छळ करण्यासाठी आधी CAA आणि एनआरसीचा मुद्दा आणला आणि आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे."
Abu Azmi On Waqf Amendment Bill
Abu Azmi On Waqf Amendment BillSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Apr : बहुचर्चित वक्फ दुरूस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) अखेर बुधवारी (ता.03) मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केल्यानंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली.

त्यानंतर झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 288 मते तर, विरोधात 232 मते पडली. मात्र, हे विधेयक लोकसभेत मंजूर होण्याआधीच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहेत ते खोटे मुस्लिम आहेत, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आझमी यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Abu Azmi On Waqf Amendment Bill
Waqf Board Amendment Bill Latest Update: मोठी बातमी: मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर अखेर लोकसभेत 'वक्फ दुरूस्ती विधेयक' मंजूर; पण...

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

वक्फ दुरूस्ती विधेयकावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले, वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहेत ते खोटे मुस्लिम आहेत. खरे मुसलमान या विधेयकाच्या विरोधात आहेत. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ही जमीन अल्लाहच्या नावावर राहील, असं वक्तव्य आझमी यांनी केलं आहे.

शिवाय जी काही कमतरता असेल ती दुरुस्त करू, मात्र तसं न करता आपण संपूर्ण कायदाच बदलणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर सरकारमधील लोकांना मुस्लिमांचा अपमान करण्याची सवय असून मुस्लिमांचा अपमान आणि छळ करण्यासाठी आधी CAA आणि एनआरसीचा मुद्दा आणला आणि आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

Abu Azmi On Waqf Amendment Bill
Waqf Board Amendment Bill Latest Update : लोकसभेत शेवटच्या क्षणी पत्ते ओपन! उद्धव ठाकरेंच्या खासदारांचे वक्फ विधेकाच्या विरोधात मतदान

मात्र, वक्फमधील दुरुस्ती आम्ही अजिबात सहन करणार नाही. जोपर्यंत मुस्लिम पर्सनल बोर्ड हे मान्य करत नाही, तोपर्यंत देशातील एकही मुस्लिम हे मान्य करणार नाही, असा इशाराच आझमी यांनी सरकारला दिला आहे. शिवाय भारत सरकार आदेश आणेल मात्र आम्ही हे मान्य करणार नाही, असंही आझमी यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम धर्मात सरकारचा हस्तक्षेप नसेल

दरम्यान, वफ्क दुरूस्ती विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसने मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे थांबवावे, असंही शाह म्हणाले. तसंच वक्फ ही व्यवस्थापन करणारी संस्था असल्याने त्यांचा कारभार पारदर्शी होण्यासाठी बदल करण्यात आल्याचंही ते यावेळी म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com