Ladki hu lad sakti hun Sarkarnama
देश

"लडकी हुँ लड सकती हुँ" मोहिमेला धक्का; ६ पोस्टर गर्लपैकी तिघींचा भाजप प्रवेश

Ladki hu lad sakti hun : काँग्रेसला उत्तर प्रदेश या मोहिमेमुळे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रियांका गांधी सांगत आहेत...

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसच्या "लडकी हुँ लड सकती हुँ" मोहिमेला चांगलाच धक्का बसला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसच्या काँग्रेस नेत्या पल्लवी सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पल्लवी सिंह या प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या "लडकी हुँ लड सकती हुँ" मोहिमेच्या प्रमुख चेहरा आणि पोस्टर गर्ल होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षावर मोठा आरोप केला आहे.

मात्र पल्लवी यांच्यापूर्वी या मोहिमेतील अन्य दोघींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी काँग्रेसच्या "लडकी हुँ लड सकती हुँ" मोहिमेच्या प्रमुख चेहरा आणि पोस्टर गर्ल वंदना सिंग आणि प्रियांका मौर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिकीट न मिळाल्याने वंदना सिंग नाराज होत्या. तसेच जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा पक्षात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाते. प्रियांका गांधी पक्ष कार्यकर्त्यांना भेटायला वेळ देत नाहीत. मी महिला मोर्चाची प्रदेशाध्यक्ष आहे. पण दोन वर्षांपासून मी ही त्यांना भेटू शकलेली नाही, असे वंदना यांनी भाजपमध्ये आल्यानंतर म्हटले होते.

तर प्रियंका मौर्य यांनी प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांच्यावर तिकिट विकल्याचा आरोप केला होता. प्रियंका मौर्य यांना लखनौमधील सरोजनी नगर मतदारसंघातून तिकिट हवे होते. मात्र, पक्षाने त्यांना या जागेसाठीचे तिकिट दिले नाही. मी माझ्या विभानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र पक्षाने तेथून मला तिकिट दिले नाही. काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण इथे आमच्याच हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही मोहीमच फसवी आहे, असा आरोप प्रियंका मौर्य यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT