काँग्रेसमध्ये आनंदोत्सव! शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपमधील मोठे मासे लागले गळाला...

Big leaders will join congress : कॉंग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांनी नाना पटोलेंचा विश्वास सार्थ ठरविला...
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मालेगावमधील महापौरांसह सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यावर राजकारणात फोडाफोडी होतचं असते; त्याला जशास तसे उत्तर द्यायचे असते असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यंतरी दिला होता. तो इशारा आता खरा निघाला असून लवकरच काँग्रेसमध्ये मेगा भरती होणार आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील महत्वाचे पदाधिकारी, अनेक विद्यमान तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, अनेक विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचा कॉंग्रेसमध्ये भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवेशामागे खरा चेहरा कॉंग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांचा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

Congress
काल रात्रीपर्यंत उपोषणावर ठाम असलेले अण्णा सकाळी म्हणतात, "मी ५० टक्के समाधानी"

राज्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरु असतानाच मालेगावमधील काँग्रेसच्या माजी आमदार, विद्यमान महापौरांसह तब्बल २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे पडसाद महाविकास आघाडीवर विशेषत: दोन्ही काँग्रेसच्या राजकारणावर उमटत आहेत. ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, त्यांचे भविष्यात काय करायचे ते ठरवू, महाविकास आघाडी असली तरीही राजकारण सुरूच असते. अशा राजकारणाला त्याच भाषेत उत्तर द्यायचे असते आणि काँग्रेसची तशी तयारी आहे. काँग्रेस पक्ष गप्प बसणारा नाही." असे नाना पटोले म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com