Election Commission of India Sarkarnama
देश

Uttar Pradesh Election: 'मिनी लोकसभा' संबोधले जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी? मोठी अपडेट आली समोर

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून साधारणत: 2027 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, आता या राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम थोड्या उशिरा होण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. उत्तर प्रदेशसह,उत्तराखंड,पंजाब,गोवा आणि मणिपूर या रा्ज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या प्रमुख राज्यांच्या आता या राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. अशातच आता या राज्यांतील निवडणुकांच्या कार्यक्रमाच्या संभाव्य तारखा समोर येत आहे.

लोकसभेतील काँग्रेससह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला हादरे देण्यास सुरुवात केली आहे. तसेच अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही आक्रमक भूमिका घेत आंदोलनं, मोर्चे,रॅली, पत्रकार परिषदा यांसह विविध मार्गांनी मोदी सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच आता पाच राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून साधारणत: 2027 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, आता या राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम थोड्या उशिरा होण्याची शक्यता आहे. तसेच तीन ते चार टप्प्यांत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.

तसेच निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2027 च्या आसपास उत्तर प्रदेशसह, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच पाचही राज्यांच्या निवडणुका 22 फेब्रुवारीनंतर घेतल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेश वगळता इतर चारही राज्यांत एकाच टप्प्यांत मतदान घेण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.

काही दिवसांपू्र्वीच निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकांकडून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या संबंधित राज्यांचे आढावा दौरे सुरू आहेत. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, आयोगाच्या पथकांचे निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन महत्त्वाच्या राज्यांचे अभ्यास पूर्ण झालेले नाहीत. ते साधारण 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तर उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी आयोगाला शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा, माघ महिन्यातील प्रयागराज येथील माघमेळा यांसारख्या विविध बाबींचा विचार करुन साधारणपणे 24 फेब्रुवारी ते 8 दरम्यान उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT