BJP Former MP Death : जनसंघाच्या काळापासूनचा निष्ठावंत शिलेदार काळाच्या पडद्याआड; आमदार, दोन टर्म राज्यसभा खासदार राहिलेल्या दिग्गज नेत्यानी घेतला अखेरचा श्वास

Veteran BJP leader Narayan Singh Kesari passes away News : विधानसभेचे आमदार आणि दोन वेळा राज्यसभेचे सदस्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत संघटनात्मक उपक्रम राबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
Naraynsingh kesari
Naraynsingh kesari Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhopal News : मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार नारायण सिंह केसरी (वय 92) यांचे रविवारी इंदोर येथे निधन झाले. केसरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. जनसंघाच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय होते. केसरी हे माजी आमदारही होते. त्यासोबतच राज्यसभेचे खासदारही होते. एक स्पष्ट आणि प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ओळख होती.

जनसंघाच्या काळापासून नारायण सिंग केसरी यांनी संघटनेचे काम केले आहे. भाजपच्या (BJP) स्थापनेनंतरही ते पक्षाशी जोडलेले राहिले. विधानसभेचे आमदार आणि दोन वेळा राज्यसभेचे सदस्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत संघटनात्मक उपक्रम राबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

केसरी यांनी अथक परिश्रमातून आणि व्यापक प्रवासामधून मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांत अनुसूचित जाती समुदायामध्ये संघटनेचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांना संघर्ष, दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतीक मानत, पक्षनेत्यांनी त्यांच्या निधनाला संघटनेसाठी झालेली मोठी हानी झाली असल्याचे भाजपच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Naraynsingh kesari
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

"जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभावी वक्ते, तसेच माजी आमदार आणि राज्यसभेचे माजी खासदार नारायण सिंह केसरी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो." अशी पोस्ट भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंग आर्य यांनी सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Naraynsingh kesari
NCP Merger : कोल्हे-भुजबळांमध्ये नेमकं काय शिजलं? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला! 'हे योग्य नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.