Sanjay Mishra  Sarkarnama
देश

Sanjay Mishra: भाजपचं धक्कातंत्र; जिल्हाध्यक्षांची खुर्ची पुसणारा त्याच खुर्चीवर झाला विराजमान!

Sanjay Mishra Political Journey: आपल्या कुटुंबासाठीची कामे सोडून ते पहिल्यांदा पक्षाच्या कार्यालयात कामासाठी येत होते. यामुळे मिश्रा यांना खूप वेळा आपल्या वडिलांचा मार खावा लागत असे

Mangesh Mahale

राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा आला. पक्षाच्या कार्यालयात झाडू मारणारा सामान्य गरीब घरातील कार्यकर्ता थेट पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला. कार्यालयात झाडू मारणे, खूर्च्या पुसणे आदी काम करणारा सामान्य कार्यकर्ता आज त्याच कार्यालयातील जिल्हाध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हाध्यक्षपदी संजय मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या कार्यालयात झाडू मारणारा कार्यकर्त्याची त्याच कार्यालयातील सर्वोच्च पदी नियुक्ती झाल्याने जिल्हा कार्यालयात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके उडवून, पेढे वाटून आनंद साजरा केला.

संजय मिश्रा हे रोज सकाळी लवकर येऊन भाजप कार्यालयाचे कुलूप उघडून झाडू मारायचे. खूर्च्यावरील धूळ साफ करीत त्या व्यवस्थित जागेवर ठेवत असे. या कामाबाबत त्यांची अन्य जण खिल्ली उडवायचे. आपल्या कुटुंबासाठीची कामे सोडून ते पहिल्यांदा पक्षाच्या कार्यालयात कामासाठी येत होते. यामुळे मिश्रा यांना खूप वेळा आपल्या वडिलांचा मार खावा लागत असे .

संजय मिश्रा यांचे सरस्वती शिशु मंदिरात प्राथमिक शिक्षण झाले आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. भाजपचे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची थेट जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करुन त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ताही मोठ्यापदी विराजमान होऊ शकतो, हा संदेश यानिमित्ताने भाजपने दिला आहे. पदभार स्वीकार असतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कोण आहेत संजय मिश्रा

लहानपणापासून आरएसएसचे कार्यकर्ते असलेले संजय मिश्रा हे 1992 मध्ये बजरंग दलाच्या शहर संयोजक म्हणून राजकारणात एन्ट्री केली. 2005 मध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष ब्रजनारायण राय यांनी संघाच्या प्रचारकाशी चर्चा करुन मिश्रा यांना भाजपमध्ये सामील करुन घेतले. त्यानंतर भाजप युवा मोर्चोच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT