BJP Leader Wife Ran With Constable Boyfriend Sarkarnama
देश

BJP News: प्रेमासाठी वाट्टेल ते...! भाजप नेत्याची बायको हवालदारासोबत पळून गेली!

Mangesh Mahale

'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं अन् आमचं सेम नसतं,' असे म्हणण्याची वेळ भाजपच्या नेत्यावर आली आहे. आपली 45 वर्षीय बायको बॅायफ्रेंडसोबत पळून गेल्याची तक्रार उत्तर प्रदेशातील भदोहीमधील एका भाजप नेत्याने पोलीस ठाण्यात दिली आहे. घरातून अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन ती आपल्या प्रियकरांसोबत पसार झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

गोपीगंज नगरमध्ये ही घटना घडली असून याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. भाडेकरु हवालदाराने पैशांसाठी आपल्या पत्नीला फूस लावल्याचा आरोपही नेत्यानं केला आहे. आपल्या बायकोच्या जीवाला तो धोका पोहोचवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपकडून अध्यक्षपदाची निवडणूक महिलेने लढवलेली होती. 

मालकीनीवरच प्रेमाचं जाळं टाकलं!

संबधीत महिला तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. तिने सोबत एका मुलाला नेलं, असून दोन मुले घरी आहेत. 30 वर्षीय हवालदार हा भाजप नेत्याच्या घरातच भाडेकरु म्हणून राहत होता. त्याने आपल्या मालकीनीवरच प्रेमाचं जाळं टाकलं. भाडेकरु हवालदारानं बायको पळून नेल्याने भाजप नेता हवालदिल झाला आहे.

कसं जुळलं सूत?

सुमारे एक वर्षापूर्वी गोंडा येथील विनय तिवारी (उर्फ राज तिवारी) या हवालदाराने गोपीगंज नगर येथे भाजपच्या नेत्यांची खोली भाड्याने घेतली. राज तिवारी अन् संबधितमहिलेचे प्रेमसंबंध सुरु झाले.याचा मागमूसगी नेत्याला नव्हता. हवालदारांना तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याबाबत कुणाला सांगितले तर सर्वांना अडकवून टाकेल, अशी धमकी त्याने दिली.

पोलीस घेताहेत हवालदाराचा शोध

दोघांच्या प्रेमाचे बिंग फुटल्यानंतर भाजप नेत्यानं राज तिवारी याला घरातून हाकलून दिले. बायकोला खूप समजलं, पण त्याचा उपयोग झाला नाही.प्रेमासाठी वाट्टेल ते...' म्हणणाऱ्या राज तिवारीने कट रचला, आपल्या गर्लफ्रेंडला फूस लावून पळवून नेले. पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून घेतली आहे. महिला आणि तिचा बॉयफ्रेंड हवालदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT