Raju Shetti: चोर-दरोडेखोर राजरोसपणे कोल्हापुरात येतात; गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी राजू शेट्टी असं का म्हणाले...

Union Home Minister Amit Shah visits Kolhapur: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 800च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.नेमका आमचा गुन्हा काय? चोऱ्या केल्या की दरोडा घातला?
raju_shetti
raju_shettisarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील शंभर रुपये देण्याच्या मागणीवरून मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.

या आंदोलनाचा धसका घेत कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जवळपास 800 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापासून सुरू झालेली कारवाई सकाळपर्यंत सुरू होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

या राज्यात न्याय आहे का नाही? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जिल्हा पोलिस प्रमुखांना सवाल करत यासाठीच मी आज पोलिस प्रमुखांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांचे पैसे बुडाले आहेत, सरकारने मध्यस्थी करूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. ज्यांनी पैसे बुडवलं त्यांना पाठीशी घालणारे नेते कोल्हापुरात येत आहेत. मग त्यांचे स्वागत आम्ही कशा पद्धतीने करावे हेच पोलिसांना विचारणार आहे, असे राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

raju_shetti
Supriya Sule: तीन आमदारांना घेऊन सुप्रियाताईंचे अजितदादांच्या विरोधात आंदोलन; नेमकं काय झालं

नेमका आमचा गुन्हा काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 800च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमका आमचा गुन्हा काय? चोऱ्या केल्या की दरोडा घातला? चोर दरोडेखोर आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी राजरोसपणे कोल्हापुरात येतात. त्यांना जमत नव्हतं तर मध्यस्थी का केली? मी केवळ भेटण्यासाठी आंदोलन करीत नाही तर मला ठोस निर्णय हवा आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.

ते पैसे का दिले नाही...

सरकारने मध्यस्थी करून दहा महिने झाले शब्द का पाळला नाही? मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर दहा तास आढळून ठेवलेला महामार्ग खुला केला. पण मुख्यमंत्र्यांनी पुढे काय केलं? मध्यस्थी का केली नाही. एक महिन्याच्या आत पैसे देणार असे कारखानदारांनी लिहून दिलं होतं, ते पैसे का दिले नाही. हे मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे होते . इथून पुढे आंदोलन केवळ होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप केला तर आम्ही विचार करू. पण आता आंदोलनावर थांबणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com