Yogi Adityanth News, UP Political News Updates
Yogi Adityanth News, UP Political News Updates sarkarnama
देश

भाजपचा फॅार्म्युला ठरला ; नव्या चेहऱ्यांना संधी ; खराब कामगिरी असलेल्यांना डच्चू मिळणार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात (uttar pradesh)भाजपला ऐतिहासक विजय मिळाला आहे. २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ (yogi adityanth) युपीचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करणार आहेत. योगीच्या नव्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत आराखडे बांधण्यात येत आहेत. (UP Political News Updates)

योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, कुणाला डच्चू मिळणार यांच्या चर्चा सध्या उत्तरप्रदेशात रंगल्या आहेत. पण भाजपने उत्तरप्रदेशात आपला फॅार्म्युला अगोदरच ठरवला असल्याचे समजते. मात्र खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जातीय-प्रादेशिक समीकरण, महिला-युवावर्गाला आदी मुद्दावरुन योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना योगी सरकारमधून डच्चू दिला जाणार आहे. त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. योगी मंत्रिमंडळातील संभाव्या मंत्र्यांची यादी दिल्लीतील भाजप हायकमांडने तयार केली आहे. जितकी मतांची संख्या जास्त, तितका मोठा वाटा, हे धोरण समोर ठेऊन विजयी उमेदवारांना मंत्रिपद दिले जाणार आहे. योगी आदित्यनाथ 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील.

नुकत्याच भाजपच्या झालेल्या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाबाबच सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महामंत्री संगटक बीएल संतोष, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा आणि महामंत्री संघटक सुनील बंसल यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री, कॅबिनेट, राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि राज्यमंत्र्यांच्या नावांवर विचारविनिमय करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT