सचिननंतर हरभजन सिंगची राजकारणात उडी ; 'आप'कडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी हरभजन सिंग यांच्या नावाची घोषणा आपने केली आहे. सध्या आप पक्षाचे राज्यसभेमध्ये नारायणदास गुप्ता, शुशीललकुमार गुप्ता तसेच संजय सिंह असे तीन खासदार आहेत.
Harbhajan Singh, Sachin Tendulkar
Harbhajan Singh, Sachin Tendulkarsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)याच्यानंतर आता हरभजन सिंग (Harbhajan Singh)याने राजकारणात उडी घेतली आहे. 'आप'ने पंजाबमधून राज्यसभेसाठी (rajya sabha) त्याच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. (aap could nominate harbhajan singh as its rajya sabha candidate)

पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत आपची सत्ता स्थापन झाल्यानंतर 'आप'ला आता आपला राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आता 'आप'ची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे. राज्यसभेसाठी हरभजन सिंग यांच्या नावाची घोषणा आपने केली आहे. सध्या आप पक्षाचे राज्यसभेमध्ये नारायणदास गुप्ता, शुशीललकुमार गुप्ता तसेच संजय सिंह असे तीन खासदार आहेत.

Harbhajan Singh, Sachin Tendulkar
Coal Scam:ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना EDचे पुन्हा समन्स

नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी आप तयारी करीत असताना त्याच्याकडे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक जिंकल्यानंतर हरभजन सिंग यांनी भगवंत मान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटमध्ये हरभजन यांनी भगवंत मान यांना आपला मित्र म्हटलं होतं. हरभजन सिंग प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे त्याचा फायदा आपला होणार आहे. आपल्या करिअरमध्ये हरभजन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी घेतलेले आहेत. पंजाबमध्ये सध्या सुरु असलेल्या काही सामाजिक कार्यात हरभजन सिंग कार्यरत आहेत.

Harbhajan Singh, Sachin Tendulkar
Congress:प्रियंकांचा राजीनामा का घेतला नाही ; जी-२३ नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना सवाल

भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पंजाबचे (Punjab)25 वे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे इतर नेते देखील उपस्थित होते. भगवंत मान (49) हे पंजाबचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याआधी प्रकाश बादल हे 43 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com