CM Yogi Adityanath Latest Marathi News  Sarkarnama
देश

योगींचं मोठं पाऊल; यूपी सरकार मुंबईतही कार्यालय थाटणार

यूपीतील महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच यूपीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी यूपी सरकारचं कार्यालय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीतील महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच यूपीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath Latest Marathi News)

सरकारकडूनच याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून लाखो लोक उत्तर प्रदेशात परत आले. यादरम्यान अनेकांना समस्या भेडसावल्या. यापार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये सरकारचं कार्यालय असावं, असं सरकारने निश्चित केलं. त्या माध्यमातून राज्यातील तिथे राहणाऱ्या लोकांची अशा संकटसमयी मदत करता येईल, हा त्यामागचा हेतू आहे.

संकटसमयी लोकांना सुरक्षितपणे परत आणणे तसेच त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालय काम करेल, असंही या प्रवक्त्यांनी सांगितले. मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरितांना पर्यटन, सांस्कृतिक आणि उत्तर प्रदेशातील इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून नव्याने उद्योग सुरू करण्यासाठीही प्रोत्साहित केले जाईल. त्यांना उद्योग उभारणीसाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ विक्री व्यवसाय, वाहतूक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो. पण कोरोना काळात त्यांना यूपीमध्ये परत यावे लागले. तर यापूर्वी यूपीतील लोकांना परके म्हणून अनेकदा त्रास देण्यात आला. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या दयेवर न ठेवता त्यांच्या समस्य़ा तिथेच सोडवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असंही या प्रवक्त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT