बड्या नेत्यांचा सहभाग उघड होईल; प्रसाद लाड यांनीच दिले मोठे संकेत

भाजपमधून आलेल्या दोघांसह राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसमधील चार आणि शिवसेनेचे दोघेजण डी-कंपनीशी संबंधित व्यवहारांत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Prasad Lad latest Marathi News
Prasad Lad latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘डी-कंपनी’ म्हणजे दाऊद इब्राहीम याच्याशी सलगी करून व्यवहार केलेल्यांच्या यादीत महाविकास आघाडीतील डझनभर नेत्यांचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनीच सूचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (MLA Prasad Lad Latest Marathi News)

'एनआयए' (NIA) ने सोमवारी मुंबई आणि परिसरात 29 ठिकाणी छापेमारी करत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रे, मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या चौकशीतूनच 'एनआयए'नं ही कारवाई केली असल्याचा दावा लाड यांनी सोमवारी केला आहे. 'एनआयए'च्या कारवाईतून मुंबईत भविष्यात होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात यातील बड्या नेत्यांचा सहभाग लवकरच समोर येणार असल्याचे वक्तव्य लाड यांनी केले आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी एनआयएकडून लवकरच आघाडीतील नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

Prasad Lad latest Marathi News
राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर

दरम्यान, डी कंपनीच्या व्यवहारांचे काही नेत्यांशी संबंध असल्याचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. भाजपमधून आलेल्या दोघांसह राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसमधील चार आणि शिवसेनेचे दोघेजण या व्यवहारांत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारमधील काही मंत्री असल्याचे समजते. डी-कंपनीकडून रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेले पैसे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर ए तयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात असल्याचा मोठा दावा 'एनआयए'ने केला आहे. (Congress, NCP, Shiv Sena Leaders On NIA Radar)

Prasad Lad latest Marathi News
'एनआयए'ची मोठी कारवाई; डी-कंपनीच्या मुसक्या आवळल्या; मुंबईत 24 ठिकाणी छापेमारी

यातूनच डी कंपनीशी संबंधित अनेकांशी काही राजकीय नेत्यांनी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. 'एनआयए'कडून संबंधितांवर कारवाईचा धमाका पुढच्या आठ दिवसात होण्याची शक्यता आहे. डी गॅंग कनेक्शनमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एका बड्या नेत्यासह काँग्रेसचा प्रमुख नेता आणि राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना भाजपवर तुटून पडणे भोवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे अंडलवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांना अटकही झाली. आता त्यांच्याशी संबधित माहिम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खंडवानी यांची 'एनआयए'कडून कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपवर सातत्याने तुटून पडणारे राष्ट्रवादीचे चार बडे नेतेही गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत लक्ष्य करणारे काँग्रेसचा एक प्रमुख नेताही रडारवर असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या एका नेत्याचेे व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. 'एनआयए'कडून संबंधितांनी केलेल्या व्यवहारांची लवकरच चौकशी सुरू केली जाऊ शकते, असं सुत्रांकडून समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com