Rahul gandi sarkarnama
देश

Congress News : उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या 11 जागांवर लढणार काँग्रेस? 'सप'च्या प्रस्तावामुळे कोंडी

Roshan More

Lucknow : इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती यांनी देखील 'एकला चलो'चा नारा दिला आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा असताना अवघ्या 11 जागांवर काँग्रेसने लढावे, असा प्रस्ताव अखिलेश यांनी दिला आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 11 जागा देऊ केल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेससोबत या जागावाटपावरून सकारात्मक चर्चा झाल्याचे देखील अखिलेश यादव यांनी सांगितले. अखिलेश यांनी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे म्हटले असले तरी यावर अजून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ()Congress News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप येथे 62 जागांवर विजय मिळवला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 70 जागा मिळतील असा अंदाज विविध सर्वे मधून व्यक्त करण्यात येतो आहे. त्यामुळे भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेस-समाजवादी पक्षाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, समाजवादी पक्षाकडून केवळ 11 जागा सोडण्याचे सांगण्यात आल्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज आहेत.

अपना दलला सात जागा

समाजावादी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ते काँग्रेसला 11 जागांपेक्षा एकही जागा जास्त देणार नाहीत. समाजवादी पक्ष राष्ट्रीय लोक दलासाठी 7 जागा सोडणार आहे. तर, 62 जागांवर निवडणूक लढणार आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले की जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत अशोक गेहलोत हे चर्चा करून असून जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT