Bihar Politics : नितीशकुमार राजीनामा देणार? भाजपसोबत पुन्हा नवा संसार थाटणार...

Bihar Political News : इंडिया आघाडी पंतप्रधानपद उमेदवारीचे दावेदार, भाजपसोबत जाणार..
CM Nitish Kumar
CM Nitish Kumar Sarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar News : बिहारमध्ये महाआघाडी सरकार कोसळण्याचे 'काऊंटडाऊन' सुरु झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार बिहारमध्ये स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आज मुख्यमंत्री नितीशकुमार राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. ते पुन्हा एकदा भाजपसोबत एनडीएचे सरकार स्थापन करतील, अशी दाट शक्यता आहे. (Bihar Politics News)

एनडीएचा बिहारमधील घटक हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर) 'हम', आरएलजेडी आणि एलजेपीचे दोन्ही गटही जेडीयू-भाजप सरकारमध्ये सामील होण्याची चिन्हे आहेत. मात्र 'हम' वगळता बाकीच्या तीनही घटक पक्षांचा बिहार विधानसभेत एकही सदस्य नाही. अशा स्थितीत बिहारमध्ये एनडीएचे नवे स्वरुप काय असेल? हे पाहणे उत्सुकता वाढवणारे आहे.

CM Nitish Kumar
Bihar Reservation Amendment Bill : बिहार सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला राज्यपालांची मंजुरी; आता 65 टक्के आरक्षण...

या सर्व पार्श्वभूमीवर आरजेडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री म्हणाले, "भाजप हा भीती दाखवून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार आरजेडीने पक्षाध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दिले आहेत."

लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत शनिवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सभेला उपस्थित राहण्यासाठी अकरा वाजल्यापासूनच आमदार जमायला सुरू झाले होते. दुपारी एक वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे तीन तास चालली. यामध्ये बिहारमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

CM Nitish Kumar
Delhi Politics : दिल्लीत 'ऑपरेशन लोटस?' आपच्या आमदारांना 25 कोटी अन् भाजप तिकीटाची ऑफर?

यावेळी लालू प्रसाद यादव म्हणाले, ठसर्वांना एकजूट राहावे लागेल. बघू पुढे काय होते ते, त्यानुसार आपण निर्णय घेऊया. याच बैठकीत तेजस्वी यादव म्हणाले, "आतापर्यंत आरजेडीने महागठबंधन सरकार चालवताना कोणतीही आक्षेपार्ह टीका- टिप्पणी केलेली नाही की, ज्यामुळे सरकारला धोका पोहचू शकते. अशा परिस्थितीत जर राजकीय परिस्थिती बदलली तर आपल्याला आणखी एकजूट व्हावे लागेल."

"महागठबंधनचे सरकार ज्या वचनबद्धतेने स्थापन झाले, ते आम्ही पूर्ण करत आहोत. जात जनगणना, पाच लाख लोकांना रोजगार आणि विविध कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याबाबतही आम्ही काम करत होतो. भाजप जात जनगणना आणि आरक्षणाला घाबरत आहे. भीती दाखवून राज्यात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना बिहारचे दिवंगत नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न द्यावा लागला," असेही तेजस्वी यादव म्हणाले.

CM Nitish Kumar
NCP Politics : पक्ष, चिन्हाबाबतच्या निर्णयानंतर शरद पवार महाराष्ट्रात वापरणार ‘प्लॅन बी’

भाजपने सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या -

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी (दि. 27 जाने) दिवसभर भाजपमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. ते राजभवनात मांडता यावे यासाठी पक्षाने सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री करण्याची योजना आखली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री म्हणून एकूण तीन नावांची चर्चा होती. हायकमांडच्या सूचनेनुसार शनिवारी बिहारमध्ये पोहोचलेले भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत कोअर कमिटीची छोटेखानी बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते हरी साहनी, माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद आणि अन्य नेत्यांसोबत सुमारे तासभर झाली.

मांझी यांचे चारही आमदार भाजपसोबत -

हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर) ('हम') चे चारही आमदार भाजपला समर्थन देणार आहेत. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या निवासस्थानी शनिवारी हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) च्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष एनडीएसोबतच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आमदारांच्या स्वाक्षरी असलेली पाठिंब्याचे पत्र भाजपला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयासोबत आहे. संध्याकाळी 6 वाजता सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत जीतन राम मांझी, राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन, आमदार प्रफुल्ल कुमार मांझी, ज्योती मांझी आणि अनिल कुमार उपस्थित होते.

बिहार विधानसभेत पक्षीय बलाबल -

* आरजेडी : 79

* भाजप : 78

* जेडीयू : 45

* काँग्रेस : ​​19

* माले : 12

* हम : 04

* सीपीआय : 02

* सीपीएम : 02

* एमआयएम : 01

* अपक्ष : 01

एकूण - 243

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com