MP Awadhesh Prasad Sarkarnama
देश

Awadhesh Prasad News : तरुणीचे डोळे फोडले, निर्घृण हत्या..! मीडियासमोर खासदार हमसून हमसून रडले, पाहा Video

Uttar Pradesh Politics Dalit Girl Rape Case Ayodhya MP : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दलित तरुणीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आल्यानंतर राजकारण तापले आहे.

Rajanand More

Political Latest Update : उत्तर प्रदेशातील राजकारण सध्या अयोध्येतील एका दलित तरुणीच्या निर्घृण हत्येमुळे तापले आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. यावरून योगी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तरुणीचे डोळे फोडण्यात आले असून निघृण हत्या करण्यात आली आहे. याविषयी मीडियासमोर बोलताना खासदार ढसाढसा रडले.

अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांचा पत्रकार परिषदेत रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एका दलित तरुणीचा मृतदेह आपत्तीजनक स्थितीत एका नाल्यामध्ये आढळून आला आहे. तरुणीचे डोळे फोडल्याचा दावा अवधेश प्रसाद यांनी केला आहे. तिच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अवधेश प्रसाद यांनी रविवारी सकाळी या घटनेबाबत पत्रकार परिषद घेतली. घटनेविषयी बोलताना त्यांना अचानक रडू कोसळले. बोलता-बोलताच ते हमसून हमसून रडू लागले. शेजारी बसलेल्या इतरांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या हत्येचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे अवधेश प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या कामकाजादरम्यान विरोधकांकडून या मुद्यावरून गदारोळ घातला जाण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींकडूनही टीकास्त्र

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही तरुणीच्या हत्येची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि लाजीरवाणी असल्याचे म्हटले आहे. तीन दिवसांपासून मुलीचे कुटुंबीय मदत मागत होते. प्रशासनाने वेळेच लक्ष दिले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. आणखी एका मुलीचा अंत झाला. कधीपर्यंत कुटुंबांना असे रडत बसावे लागणार?, असा सवाल राहुल यांनी केला आहे.

योगींचा पलटवार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवेधश प्रसाद यांचे रडणे म्हणजे नौटंकी असल्याचे म्हटले आहे. तरुणीच्या मृत्यूच्या घटनेची चौकशी होईल, त्यावेळीही समाजवादी पक्षाशी संबंधित आरोपीचा समावेश असेल, हे समजेल. सपा सर्व माफियांसमोबत आहे आणि त्यांच्या मागे उभा आहे. कोणतीही घटना झाली तरी सपाचा हात असतो, अशी टीका योगींनी केली.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT