
Sonia Gandhi controversy : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झालं. या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने करण्यात आली. मात्र, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपतींबाबत वापरलेल्या एका शब्दामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
तर याच वक्तव्यामुळे सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) अडचणीत आता चांगल्याच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आता सोनिया गांधींविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पुअर लेडी (Poor Lady) असा शब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वकील सुधीर ओझा यांनी ही तक्रार दाखल केली असून राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना देण्याची मागणीही केली आहे. तसचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनाही सह-आरोपी करण्याची मागणी ओझा यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांनी 'Poor Lady' असं म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान केल्याचा दावा करत ओझा यांनी सोनिया गांधींच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "हा देशाच्या सर्वोच्च संविधानक अधिकाराचा अपमान असून या प्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधींना देखील सह-आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.", अशी मागणी त्यांनी केली.
संसदेतील राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर, सभागृहाबाहेर पत्रकारांनी सोनिया गांधींना राष्ट्रपतींच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, शेवटी शेवटी बोलू शकत नव्हत्या. 'Poor Lady' राष्ट्रपती." तर राहुल गांधींनी देखील राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग असं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.