CM Yogi Adityanath news Sarkarnama
देश

CM Yogi Adityanath: विष प्राशन करून कारगिल योद्धा पोहचला थेट मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात! पोलिसांची धावाधाव

CM Yogi Adityanath Lucknow Janata Darbar: गाझियाबादचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्याविरोधात तक्रार घेऊन ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे एक तक्रार पत्र आढळले आहे.

Mangesh Mahale

Summary

  1. कारगिल युद्धातील निवृत्त जवान सतबीर गुर्जर (65) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात विष प्राशन केल्याचे सांगताच गोंधळ उडाला,

  2. आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर भ्रष्टाचार, "नंदू टॅक्स" वसुली आणि जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला.

  3. सतबीर गुर्जर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली

लखनौ : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आजचा जनता दरबार सेवानिवृत्त लष्करी जवानामुळे चर्चेचा ठरला. कारगिल युद्धात सहभागी असलेले सेवानिवृत्त लष्करी जवान सतबीर गुर्जर (वय 65) हे मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात आले होते. त्यांचा हातात एक निवदेन होते. ते त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना द्यायचे होते. आपण विष प्राशन करुन आल्याने त्यांनी सांगताच जनता दरबारात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थित आहे.

सतबीर गुर्जर हे गाझियाबादचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. त्यांची तक्रार घेऊन ते आले मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते, असे पोलिसांनी सांगितले. सतबीरने आपण गाझियाबादमधील लोणी येथील सिरौली येथील रहिवासी असल्याचे सांगितले. गाझियाबादचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्याविरोधात तक्रार घेऊन ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे एक तक्रार पत्र आढळले आहे.

ते कारगिल योद्धा आणि निवृत्त सैनिक आहे. मुख्यमंत्री योगी हे त्यापल्याला देवाप्रमाणे आत. लोणीचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.

आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी एप्रिल महिन्यात कलश यात्रा काढली होती. त्यांच्या उद्देश भाजप सरकार पाडण्याचा होता. या कटाची माहिती त्यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली देऊन हे प्रकरण उघडीस आणली होती.

तेव्हापासून नंदकिशोर गुर्जर यांच्यावर संबधीत आमगार यांच्यात विस्तव आहे. लोनी विधानसभा क्षेत्रात 'नंदू टैक्स' या नावानं कोट्यवधी रुपयांची वसुली होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या भष्ट्राचारात येथील अधिकारी सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती सतबीर गुर्जर यांनी व्यक्त केली आहे.

❓ FAQs

Q1: जनता दरबारात गोंधळ का झाला?
➡️ निवृत्त सैनिक सतबीर गुर्जर यांनी विष प्राशन केल्याचे सांगितल्यामुळे. गोंधळ उडाला.

Q2: सतबीर गुर्जर कोण आहेत?
➡️ कारगिल युद्धात सहभागी झालेले 65 वर्षीय निवृत्त सैनिक आहेत

Q3: त्यांनी कोणावर आरोप केले आहेत?
➡️ गाझियाबादचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर भ्रष्टाचार आणि धमकीचे आरोप.

Q4: सतबीर गुर्जर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे काय मागणी केली?
➡️ स्वतःच्या सुरक्षेसाठी मदत आणि न्याय मिळवण्याची विनंती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT