Akhilesh Yadav Sarkarnama
देश

Akhilesh Yadav : अखिलेश यांच्या घराबाहेर उद्रेक; शेकडो पोलिस, बॅरिकेडिंग, तारांचे कुंपण... काय घडलं?

Jaiprakash Narayan UP Government Samajwadi Party : जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतिस्थळी जाण्यापासून अखिलेश यांना रोखण्यात आले आहे.  

Rajanand More

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या घराबाहेर उद्रेक झाला आहे. लखनऊमधील त्यांच्या घराबाहेर शेकडो पोलिस तैनात करण्यात आले असून घराबाहेर बॅरिकेडिंग आणि तारांचे कुंपण लावण्यात आले आहे. अखिलेश हे सध्या घरातच आहेत.

समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची आज जंयती आहे. यानिमित्त अखिलेश हे गोमतीनगर मधील जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटरमध्ये आदरांजली वाहण्यासाठी जाणार होते. गुरूवारी याठिकाणी गेल्यानंतर सेटंरला पत्रे लावून बंदिस्त करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल चढवला होता.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपण सेंटरमध्ये जाणार असल्याची घोषणा अखिलेश यांनी केली होती. मात्र, यूपी पोलिसांनी सकाळी त्यांच्या घराबाहेर बॅरिकेडिंग करून रस्ता बंद केला. त्यामुळे अखिलेश घरातच बंदिस्त आहेत. अखिलेश यांना हाऊस अरेस्ट केल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे.

अखिलेश यांना घरातच अडवल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते घराबाहेर जमले असून सरकारविरोधी घोषणाबाजी केली जात आहे. कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड्स तोडण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, गुरूवारी रात्री मीडियाशी बोलताना अखिलेश म्हणाले होते की, जेपीएन सेंटर समाजवाद्यांचे संग्रहालय आहे. इथे जयप्रकाश नारायण यांच्या मुर्ती असून याठिकाणी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यातून आपण समाजवाद समजून घेऊ शकतो. पण सरकारला कसली भीती आहे? पत्र लावून सरकार काय लपवत आहे? हे विकण्याची किंवा कुणाला तरी देण्याची तयारी नाही ना?, असा सवाल अखिलेश यांनी सरकारला केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT