Delhi AAP Government : दिल्लीमध्ये 'AAP' सरकारने आमदार निधीबाबत घेतला मोठा निर्णय!

CM Atishi Delhi Chief Minister AAP : जाणून घ्या, मुख्यमंत्री आतिशी यांनी नेमकं काय सांगितलं आहे?
Delhi CM Atishi
Delhi CM AtishiSarkarnama
Published on
Updated on

Delhi MLA Fund News : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पार्टीच्या सरकारने आमदार निधीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांच्या सरकारने गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत विधानसभा निवडणुकीआधी आमदारांच्या वार्षिक निधीमध्ये पाच कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील आमदारांना मिळणारा वार्षिक निधी १० कोटींवरून वाढून १५ कोटी रुपये झाला आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की, दिल्लीतील एमएलएएलडी फंड देशात सर्वात जास्त आहे.

मुख्यमंत्री आतिशी(CM Atishi) यांनी सांगितले की, कॅबिनेट बैठकीत प्रत्येक आमदाराच्या वार्षिक निधीत पाच कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम अन्य राज्यांच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, मग ते झोपडीत राहणारे असतील किंवा मग बंगल्यात.

Delhi CM Atishi
Delhi CM House : दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानावरून उफाळणार नवा वाद? ; आतिशींना नाही मिळाली घराची चावी, कारण...

मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले की, संपूर्ण देशात कोणत्याही राज्यात एवढा निधी कोणत्याच सरकारने दिलेला नाही. जर आपण आकडेवारीचा विचार केला तर गुजरातमधील आमदारांना प्रति वार्षिक दीड कोटी, आंध्र-कर्नाटकात प्रत्येकी वार्षिक दोन कोटी, ओडिशा, तामिळनाडू, मध्य प्रदेश ३-३ कोटी आणि अनेक राज्य जसे महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड,केरळ आदी ठिकाणी पाच कोटी प्रतिवर्ष निधी दिला जातो. आता दिल्लीत आमदारांना प्रति वार्षिक तब्बल १५ कोटींचा निधा दिला जाणार आहे.

Delhi CM Atishi
Haryana Election Result 2024: हरियाणात काँग्रेसचा 'गेम' आम आदमी पक्षामुळेच झाला..!

आमदार निधी अंतर्गत प्रत्येक आमदारास त्याच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी दिला जात असतो. ही योजना १९९३मध्ये सुरू झाली होती. याचा हेतू आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि गरजांची पूर्तता करता यावीत, असा आहे.

प्रत्येक आमदारास दर वर्षी ठराविक निधीची रक्कम मिळत असते. हा निधी त्याच्या मतदारसंघातील गरजांनुसार वापरला जातो. आमदार निधीचा उपयोग विविध विकास कामे जसं की रस्ते निर्माण, वीज पुरवठा, पाणी व्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवा यासाठी केला जातो. याशिवाय आमदार निधीचा वापर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठींच्या योजनांमध्येही केला जाऊ शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com