SAmajwadi Party MLA
SAmajwadi Party MLA Sarkarnama
देश

Uttar Pradesh MLA : राज्यसभेसाठी साथ देणारे ‘ते’ 7 आमदार भाजपला नकोसे! आता पदही जाणार?   

Rajanand More

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला धक्का बसला होता. पक्षाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल सत्ता आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजपला मदत केली. त्यामुळे आपल्याला आला मोठं ‘गिफ्ट’ मिळणार, अशी स्वप्न पाहणाऱ्या या आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला. भाजपचे केवळ 33 खासदार निवडून आले आहेत. या सात आमदारांच्या मतदारसंघातही भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे भाजपने या आमदारांना दूर ठेवण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे.

सपाचे आमदार मनोज पांड्ये, पूजा पाल, राकेश पांड्ये, विनोद चतुर्वेदी, आशुतोष वर्मा आणि अभय सिंह या आमदारांच्या मतदारसंघात भाजपला फटका बसला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप या आमदारांना भाव देताना दिसत नाही. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही संबंधित आमदारांबाबत कठोर भूमिका घेतल्याचे समजते.

धोका देणाऱ्यांना माफी नाही, असे अखिलेश यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे संबंधित आमदारांना अपात्र करण्याची मागणी समाजवादी पक्षाकडून केली जाऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत संबंधित आमदारांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द होऊ शकते. असे झाल्यास त्यांना भाजपही दूर करू शकते.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. सात आमदार अपात्र ठरल्यास पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीत भाजप तिकीट देणार की नाही, याबाबत आता संबंधित आमदारांमध्ये धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. तर या आमदारांना पराभूत करण्यासाठी अखिलेश मोठी ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे सात आमदारांच्या राजकीय वाटचालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT