Mayawati, Akash Anand
Mayawati, Akash AnandSarkarnama

Akash Anand : मायावतींची मोठी घोषणा; आकाश आनंद हेच असतील उत्तराधिकारी...

Mayawati Bahujan Samaj Party National Coordinator Akash Anand : काही महिन्यांपुर्वीच मायावती यांनी आकाश आनंद यांच्याकडून राष्ट्रीय समन्वयक हे पद काढून घेतलं होतं.
Published on

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाच्यालाच उत्तराधिकारी जाहीर केले आहे. आकाश आनंद हेच मायावतींचे उत्तराधिकारी असतील.

मायावती यांनी रविवारी आकाश आनंद यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली. तसेच उत्तराधिकारी म्हणूनही जाहीर केले. काही महिन्यांपुर्वीच आकाश यांना हे पद देण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.

एक दिवसापुर्वीच आकाश यांना उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत मायावती यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले होते. तसेच दोन राज्यांचे बनवले आहे. त्यामुळे आकाश यांना पक्षात पुन्हा मानाचे स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार रविवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Mayawati, Akash Anand
Suraj Revanna : धक्कादायक! पक्षातील कार्यकर्त्याशीच अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी आमदाराला अटक...

मायावती यांनी रविवारी लखनऊ येथे बसपाच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीला आकाश आनंदही उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आकाश आनंद यांना मायावतींनी पदावरून हटवल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.

Mayawati, Akash Anand
kartikeya Chouhan : 'आज दिल्लीही आपल्या नेत्यासमोर..' ; केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या मुलाचे विधान चर्चेत!

लोकसभा निवडणुकीत मायावतींचा एकही खासदार निवडून आलेला नाही. मात्र, उत्तर प्रदेशातील प्रचारादरम्यान आकाश आनंद यांच्या भाषणांचे कौतुक झाले होते. त्यांच्या आक्रमक भाषणांना कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसादही मिळत होता. यादरम्यान मायावतींनी त्यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर आकाश प्रचारात सक्रीय दिसले नाहीत. आता पुन्हा ते पक्षाचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com