Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या करहल विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टी(सपा)चे प्रमुख अखिलेश यादव 2022मध्ये आमदार झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
पोटनिवडणुकीत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पक्षाने मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातीलच तेजप्रताप यादव यांना उमेदवार बनवले आहे. तर भाजपने या जागेवर मुलायम सिंह यादव यांचे बंधू अभयराम यादव यांचे जावाई अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. मुलायम सिंह यादव कुटुंबातील मुलगा आणि जावाई यांच्यातील लढतीमुळे यादव बहुल करहल मतदारसंघातील निवडणूक अतिशय रंजक बनली आहे.
करहल मुलाम सिंह यादव कुटुंबाचा गड आहे आणि समाजवादी पार्टीच्या गडाला सुरुंग लावण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने देखील या मतदारसंघातून कुटुंबातील व्यक्ती नाहीतर, नातलग ठीक असं म्हणत परिवारातील सदस्यालाच उमेदवारी दिली. करहलमधील निवडणुकीचा कल समाजवादी पार्टीच्या बाजूने दिसत आहे, तर या मतदारसंघात एकदा भाजपचे कमळही फुललेलं आहे. या निमित्त पाहूयात मतदारसंघाचा इतिहास.
वर्ष 1992मध्ये समाजवादी पार्टी (Samajwadi Party) राजकीय पटलवार एक राजकीय पक्ष म्हणून उदयास आली आणि 1993च्या निवडणुकीपासूनच मुलायम सिंह यादव यांची कर्मभूमी राहिलेला करहल मतदारसंघ पक्षाचा गड म्हणून नावापरूपास आला. वर्ष 1992मध्ये समाजवादी पार्टीने करहल मतदारसंघातून बाबूराम यादव यांना उमेदवार बनवलं होतं आणि या निवडणुकीत ते विजयी झाले होते. यानंतर 1996च्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही बाबूराम यादव विधानसभेत पोहचण्यात यशस्वी ठरले होते. समाजवादी पार्टीने राजकीय पक्ष म्हणून उत्तरप्रदेशच्या राजकारणात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला मात्र त्यांची हॅटट्रिक भाजपने रोखली होती.
वर्ष 2022च्या उत्तर प्रदेश विधासभा निवडणुकीत समाजवादी पार्टी करहल मतदारसंघातून हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी पक्षाने बाबूराम यादव यांचे पुत्र अनिल यादव यांना उमेदवार केलं होतं. तर भाजपने (BJP) करहलमधून विजय मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. भाजपला समाजवादी पार्टीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायचा होता आणि म्हणूनच भाजपने या ठिकाणी यादव कार्डच चालवलं.
भाजपने मुलायमसिंह यादव यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे दर्शनसिंह यादव यांचे बंधू सोबरन सिंह यादव यांना करहल मतदारसंघातून आपला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. अटीतटीच्या लढतीत करहलमध्ये अखेर भाजपने 925 मतांनी विजय मिळवला आणि समाजवादी पार्टीची हॅटट्रिक हुकली. हाच विजय आतापर्यंत भाजपचा एकमेव विजय देखील आहे कारण तेव्हापासून करहलमध्ये भाजपचे कमळ उमलेलं नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.