Girdhari Lal Sahu, husband of Uttarakhand minister Rekha Arya, seen addressing youths at a public event amid controversy over his remarks on Bihar girls. Sarkarnama
देश

Rekha Arya Husband : '20 ते 25 हजारांत मुली मिळतात...', भाजपच्या महिला मंत्र्याच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Uttarakhand Minister’s Husband Controversy : उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्या यांचा पती गिरधारी लालू साहू यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधतताना त्यांनी हेआक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jagdish Patil

Uttarakhand Minister’s Husband Controversy : "लग्न करायचं असेल तर बिहारमधून मुलगी आणूया. तिथे 20 ते 25 हजारांत मुली मिळतात', असं वादग्रस्त वक्तव्य चक्क एका महिला मंत्र्याच्या पतीने केलं आहे. या वक्तव्यामुळे आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

भाजप नेत्या तथा उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्या यांचा पती गिरधारी लालू साहू यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधतताना त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत गिरधारी लालू साहू समोर असलेल्या तरूणांना उद्देशून म्हणतात की, "तुम्ही म्हातारपणात लग्न करणार आहात का? आतापर्यंत तीन चार मुलं झाली असती. तुमच्यासाठी बिहारमधून मुली आणूया. बिहारमध्ये 20 ते 25 हजारांत मुली मिळतात." लालू साहू यांच्या या वक्तव्यावरून उत्तराखंड, बिहारसह देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

या वक्तव्याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने साहू यांना नोटीस देखील बजावली आहे. तर काँग्रेस महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती रौतेला यांनी साहू यांचं वक्तव्य लज्जास्पद असून त्यांची पत्नीच महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत. अशा प्रकारची विचारसरणी महिलांचं शोषण सारख्या गोष्टींना प्रोत्साहन देतात, असं म्हटलं.

तर राजद नेते तेजस्वी यादव यांनी दहा हजार रुपयांना मते खरेदी केल्यानंतर भाजप नेते आता बिहारमधून मुली आणण्याबाबत बोलत आहे. यातून महिलांबाबतची त्यांची विषारी मानसिकता स्पष्ट दिसून येतेय, असं म्हटलं आहे. दरम्यान, चौफेर टीकेनंतर मंत्री रेखा आर्या यांच्या पतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये ते म्हणतात की, "मी दौलाघाट परिसरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. त्या कार्यक्रमात गंमतीने आपल्या मित्राच्या लग्नाबद्दल मा चर्चा करत होतो. मात्र, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याकरता माझ्या वक्तव्याचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने प्रसारीत करून त्याचा विपर्यास केला जात आहे. पंरतू माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावले असेल तर मी हात जोडून माफी मागतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT